झाडातून पाणी वाहते तेव्हा...(व्हिडिओ)

झाडातून पाणी वाहते तेव्हा...(व्हिडिओ)

देवरूख - नजीकच्या पूर गावात कवळ तोडलेल्या आईनाच्या झाडातून चक्‍क ४५ मिनिटे नळासारखे पाणी बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले. दरम्यान, गावातून याची माहिती घेतली असता हा प्रकार खरा निघाला; मात्र याबाबत अधिक बोलण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून आईनाच्या झाडाच्या शेंडा व खोड याच्या मध्यवर्ती भागातून नळासारखे पाणी पडताना दिसत आहे. याचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. हा व्हिडीओ वेगाने संपूर्ण तालुक्‍यात पसरला व सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. व्हिडीओवर पूर गावाचा उल्लेख असल्याने काही पत्रकारांनी त्या गावात जाऊन याची चौकशी केली असता, हा प्रकार कालचा असल्याचे सांगण्यात आले.

गावातील काही मुले नदीशेजारी क्रिकेट खेळायला गेली होती. त्याचवेळी झाडातून पाणी पडत असल्याचे कुणीतरी पाहिले. याची ओरड झाल्यावर अनेकांनी तिकडे धाव घेतली. काही हौशींनी याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ते व्हायरल झाले. बघणाऱ्यांच्या दाव्यानुसार झाडातून पाणी येण्याचा प्रकार ४० ते ४५ मिनिटे सुरू होता. सर्वांनी झाडाभोवती तसेच आजूबाजूला तपासणी केली. मात्र, यातून काही निष्पन्न झालेले नाही. दरम्यान आज पुन्हा काही हौशींनी या झाडावर पाळत ठेवली होती. मात्र, असा प्रकार पुन्हा झालेला नाही. यामुळे यामागचे गौडबंगाल तसेच आहे.

जेथे पाण्याचा साठा जास्त असतो. अशा भागात ऐनाचे झाड असेल तर त्यातून नळाला पाणी येते तसे पाणी येऊ शकते. यात आश्चर्य वाटण्यासारखे किंवा अंधश्रद्धा असण्यासारखे काही नाही. ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. मुळातून पाणी खोडाजवळ व खोडातून पानापर्यंत पोहोचते. हे पाणी वाहीन्यामार्फत व्हावून नेले जाते. पाणी वाहून नेणाऱ्या या वाहिन्यांना (झायलम) इजा झाली तर तेथून अशा प्रकारे पाणी बाहेर येऊ शकते. 
- डाॅ मधुकर बाचुळकर,
ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com