दहा वर्षांनंतर पाणीबाणी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

देवरूख / साडवली - संगमेश्‍वर तालुक्‍यातील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या अर्धशतकापार पोचली. आता देवरुखातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने तळ गाठला आहे. बुधवारपासून (ता. २४) देवरूखवासीयांना नळपाणी योजनेचे पाणी बंद होणार आहे. यामुळे पावसाळा पूर्ण क्षमतेने पाऊस सुरू होईपर्यंत देवरुखात पाणीबाणी राहणार आहे. गेल्या कित्येक वर्षात देवरूखवासीयांवर अशी वेळ  आली नव्हती. 

पाणीबाणीला तोंड देण्यासाठी नगरपंचायत सक्षम असून शहरवासीयांना एक दिवस आड टॅंकर तसेच घंडागाडीने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरात १९९० नंतर सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेद्वारे शहरातील २ हजार नळकनेक्‍शनधारकांना नियमित पाणीपुरवठा होतो. टंचाईच्या काळात हा पुरवठा एक दिवसाआड होतो. मे महिन्याच्या आरंभापर्यंत दोन्ही धरणात साठा उत्तम होता; मात्र पर्शरामवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने दुसऱ्या धरणातील पाणी चरावाटे काही दिवसांपूर्वीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पर्शरामवाडी धरणातले पाणीही आटल्याने नगरपंचायतीसमोर संकट उभे राहिले. धरणातील पाणी पंपाने खेचले जात नाही, खेचल्यास चिखलयुक्‍त पाणी टाकीत जाते. त्यामुळे आता पाणीपुरवठा बंद करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती नगराध्यक्ष नीलेश भुरवणे व उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी ‘सकाळ’शी 
 
बोलताना दिली. बुधवारपासून (ता. २४) नगरपंचायतीतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने खासगी साठ्याचा आधार घेऊन टॅंकर तसेच घंटागाडीचा उपयोग करून प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक कनेक्‍शनधारकापर्यंत एक दिवस आड का होईना पण पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे नगराध्यक्षांनी सांगितले. गेल्या १० वर्षांत देवरुखात दुसऱ्यांदा पाणीबाणी निर्माण झाली आहे. 

Web Title: water issue in devrukh