झाप गावचा पाणी प्रश्न अखेर सुटला

pali
pali

पाली - (वार्ताहर) झाप हे पाली ग्रूप ग्रामपंचायत हद्दीत असलेले मोठे गाव आहे. मागील अनेक वर्षांपासून गावात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत होता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतीही तांत्रिक व ठोस उपाययोजना केली गेली नव्हती. मात्र पाली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित अपक्ष सरपंच व सदस्यांनी ही समस्या दूर केली. त्यामुळे रविवारी (ता.11) झाप ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. 

झाप गावात पाण्याची समस्या अतिशय गंभीर होती. ही समस्या सुटावी यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन केले होते. मोर्चे काढले होते मात्र कोणीही त्यांची दखल घेतली नाही. परंतु पाली ग्रामपंचायत नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी मागील महिन्यात झाप ग्रामस्थांचा पाणीपुरवठा सुरळीत केला. तरीसुद्धा पाणी पुरवठा चालु केल्यानंतर काही दिवसांनी पाणीपुरवठा कमी आणि अनियमित झाला होता. मग नवीन सदस्यांनी गावात फिरून सर्वेक्षण केले. त्यावेळी समजले की काही ठिकाणी पाण्याच्या लाईनचे पाईप चेपले गेले होते. वहिनीला गळती लागली होती. पाण्याची लाईन चोकअप आहे.  तसेच पाण्याचा दबाव देखील कमी आहे. मग सदस्यांनी काही गावकऱ्यांच्या मदतीने चेपलेले पाईप सरळ केले. ववाहिन्यांना बाह्यवळण दिले (बायपास). जिथे वाहिन्या गळत होत्या तिथे नवीन वाहिन्या टाकल्या. पाण्याचा दाब वाढविला आणि अशा प्रकारे पाणी पुरवठा सुरळीत करून झाप गावचा पाणी प्रश्न मार्गी लावला. 

सत्कार कार्यक्रमावेळी उपसरपंच विजय मराठे, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत ठोंबरे, गायत्री सावंत, शितल पटेल, भास्कर दुर्गे व मिलिंद गोळे यांच्यासह स्वप्नील बालके तसेच नंदू कुडपणे, परशुराम सुतार, योगिता सितापराव, विद्या कुडपणे, मंदा लहाणे, महेश सितापराव, ज्ञानेश्वर लहाणे, मनीषा मोरे, मनीषा कुडपणे, प्रकाश जंगम, राजेश दळवी, शिवाजी हुले आदी ग्रामस्थ उपस्थीत होती.

गावचा पाणी प्रश्न सोडविल्याने मुंबई मंडळाची माणसे गावाला सुट्टीला आल्यावर त्यांनी सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार हा कार्यक्रम झाला. 

पाण्याला दाब नसल्याने साठवण टाकी भरली जात नव्हती त्यामुळे पाणी एक दिवसाआड मिळत होते. तसेच इतर तांत्रिक समस्या होत्या. त्या आता सोडविल्याने झाप गावाला रोज पूर्ववत व नियमित पाणी मिळेल. यासाठी गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. तसेच बल्लाळेश्वर देवस्थानने दिलेल्या पंपाचा दाब चांगला असल्याने पाणी अजून दाबाने येईल.
अमित निंबाळकर, सदस्य ग्रुप ग्राम पंचायत पाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com