पणजी शहरातील बुजलेल्या गटारांमुळे रस्त्यावर पाणी 

विलास महाडिक 
शुक्रवार, 8 जून 2018

पणजी - गोव्यात काल रात्रीपासूनच मान्सून दाखल झाला असून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाच्या सुरुवातीलाच आज पणजी महापालिकेच्या परिसरात अनेक भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले. 

पणजी - गोव्यात काल रात्रीपासूनच मान्सून दाखल झाला असून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाच्या सुरुवातीलाच आज पणजी महापालिकेच्या परिसरात अनेक भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले. 

मिरामार, कांपाल येथील रस्त्यावर पाणी तुंबल्याने पणजी महापालिकेचे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे उघडून कचरा काढण्याचे काम करते. यावेळी पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर व अधिकारी या कामावर लक्ष देत होते. काही ठिकाणी असलेली गटारे डांबरीकरणावेळी बुजविल्याने पाणी जाण्यासाठी गटाराची वाट बुजल्याने रस्त्यावर पाणी साचून राहिले होते. पहिल्या पावसातच राज्याची राजधानी असलेल्या पणजीत पाणी साचल्याने महापालिकेसमोर समस्या उभी राहिली आहे.

Web Title: Water on the road due to rain in Panaji city

टॅग्स