दिवसरात्र पाणीच भराव लागतं, मजुरीवर पण जाता येत नाही..

pali
pali

पाली (रायगड) : सुधागड तालुका डोंगर दऱ्यांनी वसलेला अादिवासी बहुल तालुका अाहे. येथील ४ गावे व १० अादिवासी व धनगर वाड्या-पाड्यांवर भीषण पाणी टंचाई अाहे. ही अाकडेवाडी शासनाची अाहे मात्र प्रत्यक्षात अनेक गावे, वाड्या व पाडयांवर पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुरवरुन पाणी भरण्यास व घेवून येण्यास वेळ व श्रम झाल्याने अनेकांचे रोजगार बुडत आहे.

जवळपास २५० ते ३०० घरे व साधारण १००० लोकवस्ती असलेल्या तालुक्यातील दर्यागाव या अादीवासी वाडीवर तीव्र पाणी टंचाई अाहे.येथे प्रत्यक्षात जावून तेथील लोकांशी संवाद साधून सकाळने परिस्थितीचा अाढावा घेतला. गावात दोन विंधन विहिरी व दोन विहिरी अाहेत. त्यातील एक विहिर बुजली असुन दुसर्या विहिरीतील पाणी अाटले आहे. तर विंधन विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असुन पाणी येण्यासाठी खूप वेळ लागतो.

गावात पाणी टंचाईबद्दल जाणून घेत असताना एका घराच्या खिडकीतून अादिवासी महिला बोलू लागली. रात्रभर अाणि दिवसभर पाणीच भराव लागत. मजूरीवर पण जावाय भेटत नायं… विहीर अाटली हाय.. हापासीला थोड थोड पाणी येत… सकाळी गेल की दुपार होते पाणी भरायला. अशी डाकी शिद नावाची ती अादिवासी महिला व्याकूळ होऊन सांगत होती. गावातील दोन शाळकरी पोर अाम्हाला विहिर दाखवायला घेवून गेली. उंच टेकडीवर वसलेल्या या अादीवासी वाडिच्या पायथ्याला दुरवर शेतातील विहिर व त्या बाजुला असलेली हापसी दाखविली. इतक्या दुरवरुन अाडवाटेवरुन डोंगर चढून या महिला व लहानमुले हंडाभर पाणी अाणतात. सातवीत शिकणार्या रोहन शिद या अादिवासी मुलाने सांगितले अाम्ही पोर सुद्धा पाणी भरायला जातो.

मागील २५ ते ३० वर्षापासून दर्यागाव (पाच्छापुर) व खांडपोली येथील प्रस्तावीत धरणे प्रलंबित अाहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही महत्वाची धरणे अाजतागायत कागदावरच आहेत. हि धरणे व्हावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते अारिफ मनियार यांनी दोन वेळा उपोषण केले होतो. या धरणांमुळे भूजल पातळी वाढेल.तालुक्यातील पाणी टंचाई दूर होईल. विस्थापित देखील कमी होतील.

अादिवासींचे सर्वाधिक हाल, रोजगारावर कुर्हाड, तालुक्यातील अादिवासी वाड्या व पाड्यांवर देखिल मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष आहे. वाडीपासून दुर व खडतर वाटेवर असलेल्या विहिरीवरुन, विंधन विहिरीतून किंवा डवर्यातून या अादिवासींना पाणी अाणावे लागत आहे. शुद्ध अाणि ताज्या पाण्यापासून ते वंचित रहतात. तसेच पाणी अाणण्यासाठी श्रम व वेळ दोन्ही वाया जातो परिणामी त्यांचा रोजगार बुडत आहे. 

पाली-सुधागड पंचायत समिती मार्फत केल्या जाणार्या टंचाई कृती अाराखड्यामध्ये बुडक्या/डवरा घेणे, सार्वजनिक विहिरी खोल करणे/गाळ काढणे, खाजगी विहिरी/विंधण विहिर अधिग्रहण करणे,टँकर/बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे, प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजना पुर्ण करणे, नळ पाणी योजनांची विशेष दुरुस्ती करणे,विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधण विहिरी घेणे, तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना घेणे अाणि विंधण विहिरींचे जलभंजन या उपायोजना केल्या जातात. परंतू या वर्षी यातील केवळ टँकर/बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे अाणि विंधण विहिरी घेणे या दोनच उपाययोजना केल्या आहेत.

तालुक्यातील अापटवणे, दर्यागाव, बलाप व चंदरगाव या गावांसह भावशेत ठाकुरवाडी, सावंतवाडी, भोप्याचीवाडी, महागाव अादिवासी वाडी, उंबरवाडी, कालकाईवाडी, मुळशी, खैराटवाडी, अातोणे अादिवासी वाडी, व कणी धनगरवाडा या दहा वाड्यांचा सामावेश टँकरने किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी टंचाई कृती अाराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र अजुन पर्यंत येथे टँकरने किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेले नाही.येथून अजुन मागणी अाली नसल्याने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

टंचाई कृती अाराखड्यात १५ गावे व १७ वाड्यांचा समावेश विंधन विहिरी घेण्यासाठी करण्यात आला अाहे.त्यातील १५ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली असुन ७ विंधन विहिरी घेण्यासाठी प्रपत्र भरण्यात अाले अाहे. अजुनही १० विंधन विहिरी घेण्यासाठी कोणतीच तरतूद केली गेलेली नाही.

सोमवारी (ता.२३) पर्यंत एकुण सहा वाड्यांवर विंधन विहिरी घेण्यात आल्या मात्र यातील नाणोसे चांभारवाडा, कालकाईवाडी व केळगणी ठाकुरवाडी येथील विंधन विहिरींना पाणी लागले नाही. एकदा विधंन विहिरी कोरड्या गेल्यास पुन्हा त्या ठिकानी विंधन विहिर घेतली जात नाही. परिणामी ते गाव किंवा वाडी विंधनविहिरी शिवाय वंचित राहते.शासनाकडून अत्यंत कमी पैसे (बाजार भावाच्या निम्मे) मिळत नसल्याने विंधन विहिरी खोदण्यासाठी ठेकेदार तयार होत नाहीत.

विंधण विहिरी (बोअरवेल), विहिरींचे पाणी तळाला, नद्यानाले व बंधारे अाटले 
खांडसई, भोप्याचीवाडी, महागाव, चंदरगाव, देवूळवाडी,चव्हाणवाडी, अापटवणे, गोगूळवाडा, अातोणे, भार्जे अादिवासीवाडी अादी गावे व वाड्यांवरील विंधण विहिरी (बोअरवेल), विहिरींचे पाणी तळाला गेले आहे. विंधण विहिरी (बोअरवेल), विहिरींच्या पाण्याचा पुनर्भरणा करण्यासाठी शासनाकडुन किंवा स्वयंसेवी संस्थांकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने दर वर्षी मार्च अखेरपासूनच येथे टंचाई निर्माण होते. तालुक्यातील अनेक विहिरी मोडकळीस अाल्या आहेत. काही विहिरीचे पाणी अशुद्ध झाले आहे.छोट्या नद्या, नाले व बंधार्यांची देखील तीच अवस्था आहे. वाढत्या उष्म्यामुळे त्यांचे पाणी देखील अाटते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट कारावी लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com