खेडमधील नदीपात्रे फेब्रुवारीतच कोरडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

खेड - तालुक्‍यात या वर्षी पाच हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडूनही पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे आहे. तालुक्‍यातील सर्वच नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नदीपात्र कोरडी पडू लागली असून तालुक्‍यात मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. या वर्षी तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यात ३६ गावे ५५ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ३२ वाड्यांची वाढ झाली आहे.

पावसाळ्यानंतर खेड तालुक्‍यातील सर्वच नद्या जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत प्रवाही असतात. त्यानंतर नदी पात्र कोरडे पडल्याचे चित्र दिसून येते. या वर्षी फ्रेबुवारी महिन्याच्या पंधरवड्यातच हे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्‍यातील प्रमुख नद्याच्या पातळीत घट झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याची अशी भयावह स्थिती असल्याने पुढील तीन महिन्यांत भीषण पाणीटंचाई जाणवेल, असे संकेत आहेत.

खेड तालुक्‍याच्या बांद्री पट्टा, चाळीसगाव, पंधरागाव व तुळशी देवाचा डोंगर या ठिकाणी दरवर्षीच पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असते. सध्यस्थितीत बांद्री पट्टा, चाळीसगाव, पंधरागाव या परिसरातील नद्या कोरड्या पडल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात २१५ गावे असून गेल्यावर्षी ३० टक्के गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यासाठी सुमारे २२ लाख रुपये खर्ची टाकण्यात आले. गतवर्षी आराखड्यात २३ वाड्या ३८ गावांचा समावेश होता. त्यामध्ये यावर्षी वाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रत्यक्षात दरवर्षी खर्च होऊनही आणि पाणीयोजना, बंधारे बांधूनही टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झालेली नाही. 

दरवर्षी टॅंकर धावणारी गावे
निवे, घेरारसाळगड, तळे, मांडवे, चोरवणे, नांदिवली, धामणी, खवटी, म्हाळुंगे, तुळशी-देवाचा डोंगर, घोगरे, आंबये, कासई, आंबवली, हेदली, दहीवली, कासई, कावळे, तळवटपाल, खोपी, कुळवंडी, शिरवली, दयाळ, तिसंगी या गावांमध्ये दरवर्षी टॅंकर धावतो.

Web Title: Water shortage in khed

टॅग्स