आराखड्यात ३६९ वाड्यांवर टंचाईचे सावट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

२ कोटी ६५ लाख मंजूर - नळ योजना दुरुस्तीसाठी २५ लाख वाढीव
रत्नागिरी - जिल्ह्याचा २ कोटी ६५ लाख ६६ हजारांच्या संभाव्य टंचाई कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. १५१ गावांतील ३६९ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण होऊ शकते. या आराखड्यात विंधण विहिरी आणि नळ योजना दुरुस्तीचाही समावेश केला आहे. अल्प तरतुदीमुळे नळ योजना दुरुस्तीला निधी मंजूर केलेला नव्हता. मात्र, शासनाने २५ लाखांची वाढ केल्याने हा आराखडा पावणेतीन कोटीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे ३१ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६६ लाखांची तरतूदही केली आहे. त्यातून अनेक नादुरुस्त योजना मार्गी लागणार आहेत.

तालुकास्तरावरून आराखडे निश्‍चित करण्यात उशीर झाल्याने जिल्ह्याचा टंचाई आराखडा विलंबाने तयार झाला. चार दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने यावर प्रकाश टाकला. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. यावर्षीच्या २ कोटी ६५ लाखांच्या आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला आहे. गतवर्षी आराखड्यामध्ये फक्‍त टॅंकरसाठी ३५ लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली होती. 

त्यापूर्वी २०१५ ला पावणेदोन कोटींचा आराखडा बनविला होता. यावर्षी हा आराखडा एक कोटीने वाढला आहे. नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटीहून अधिक निधी ठेवण्यात आला. ९५ विंधनविहिरींसाठी ५७ लाख, खासगी विहिरी अधिगृहीत करण्यासाठी १ लाख ४० हजार, टॅंकरसाठी ४१ लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे.

नवीन विंधन विहिरींसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. त्यानंतर त्वरित ही कामे हाती घेण्यात येतील. खेड येथे टॅंकरची मागणी झाली आहे; परंतु अद्यापही टॅंकर दिलेला नाही. नळ योजना दुरुस्तीसाठी टंचाईतून निधी मिळणार असला तरीही तो खर्ची टाकण्यात अनेक अडथळे आहेत. 
एक महिना उशिराने आराखडा मंजूर झाला आहे. तांत्रिक मंजुरी मिळवणे, निविदा काढणे यासह प्रत्यक्ष कामाला सुरवात करून त्याची पूर्तता करणे यासाठी तीन महिन्यांचा कालावधी कमी पडणार आहे.

Web Title: water shortage wadi in ratnagiri district plan