जलक्रीडांमुळे मालवणातील पर्यटन तरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मालवण - जीएसटीचा प्रभाव पर्यटन हंगामावर कायम आहे; मात्र तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या जलक्रीडासह स्कुबा डायव्हींग आणि स्नॉर्कलींगमुळे पर्यटन व्यवसाय तरला आहे.

मालवण - जीएसटीचा प्रभाव पर्यटन हंगामावर कायम आहे; मात्र तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या जलक्रीडासह स्कुबा डायव्हींग आणि स्नॉर्कलींगमुळे पर्यटन व्यवसाय तरला आहे.

नाताळापासून सुरू झालेला हंगाम आता बहरू लागला आहे. शहरात गर्दी कमी दिसत असली तरी तारकर्ली, देवबाग पर्यटकांनी ओसंडून वाहत आहे. देवबाग त्सुनामी, तारकर्ली तसेच अन्य किनारपट्टी भागात साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी सर्वाधिक गर्दी दिसत आहे. जीएसटीचा परिणाम गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्येही जाणवला होता. आजही हा प्रभाव कायम आहे; मात्र जलक्रीडा प्रकारांच्या आकर्षणामुळे किनारपट्टी भागात आर्थिक उलाढाल यंदा टिकून आहे.

किनारपट्टी भागातील तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, दांडी, बंदर जेटी, चिवला वेळा, सर्जेकोट याठिकाणच्या स्कूबा, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, अन्य साहसी जलक्रीडा प्रकारांकडे पर्यटकांचा मोठा ओढा दिसत आहे.

Web Title: Water sports in Malvan Tourism special