गडनदीपात्रात 1 मे पासून वॉटर स्पोर्टस्‌ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

कणकवली - आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून गडनदीपात्रात वागदे येथे विविध जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. 1 मे पासून या ठिकाणी वॉटर स्पोर्टस्‌च्या सुविधांचा प्रारंभ होणार आहे. 

सिंधुदुर्गात उन्हाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित जलक्रीडा प्रकारांचा आनंद घेता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी पत्रकातून दिली आहे. वागदे येथील गडनदीपात्रात होणाऱ्या विविध जलक्रीडा प्रकारांमध्ये कयाकिंग, जेटस्की, बनाना राइड, बंपर राइड, झोर्ब बॉल अशा वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद पर्यटक आणि स्थानिकांना लुटता येणार आहे. 

कणकवली हे मुंबई-गोवा महामार्गावरील शहर असून गडनदीपात्र हे महामार्गालगत असल्याने या सेवेचा आनंद पर्यटकांना व्हावा, त्याचप्रमाणे उन्हाळी सुटीत मुलांना या वॉटरस्पोर्टस्‌चा आनंद घेता यावा, पाण्यावर मौजमजा-मस्ती करता यावी आणि सुरक्षित जलक्रीडा व्हावी, यासाठी जाणकार आणि प्रशिक्षित व्यवस्थापकांची टीम कार्यरत करण्यात आली आहे.

Web Title: Water sports from May 1