'पाणीपुरवठा योजना पुनर्जिवितसाठी वानिवडेत कृती आराखडा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कणकवली - जिल्ह्यातील वानिवडेतील (ता. देवगड) पाणीपुरवठा योजना पुनर्जिवित करण्यासाठीच्या कामांचा समावेश सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक कृती आराखड्यात करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 

आमदार राणे यांनी आपल्या मतदारसंघातील वानिवडे या गावासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर लोणीकर यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, या गावासाठी 1993 पासून नळयोजना बंद आहे. या गावासाठी बापार्डे खैराटवाडी येथील विंधन विहिरीवरून योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन 10 फेब्रुवारी 2016 रोजी ठराव केला होता. मात्र सद्यस्थितीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2016-17 मध्ये वानिवडे भटवाडी व सरवणकरवाडी येथील विंधन विहीर घेण्यासाठी कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सध्या वानिवडे गावामध्ये भटवाडी येथे 1 विंधन विहीर कार्यान्वित आहे; तसेच मांगरवाडीसाठी 1 दुहेरी पंप योजना कार्यान्वित असून सरवणकरवाडी व बंदरवाडी येथे खासगी विहिरीद्वारे येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहितीही श्री. लोणीकर यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार श्री. राणे यांना दिली आहे. 

Web Title: water supply scheme vanivadet action plan