स्‍वच्‍छता हा समृद्धीकडे जाण्याचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. भविष्यात याठिकाणी शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असा विश्‍वास कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सिंधुदुर्ग किल्ला येथे व्यक्त केला. 

श्री. देशमुख हे मालवण तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. यात त्यांनी वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ऐतिहासिक मोरेश्‍वर देवस्थान व किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी भेटी दिल्या. 

याठिकाणी आवश्‍यक असणाऱ्या सुविधांबाबत स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. तसेच ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या पर्यटक कर वसुली केंद्राचे उद्‌घाटन सिंधुदुर्ग किल्ला याठिकाणी आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी जलपुरुष राजेंद्र सिंह, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार वीरधवल खाडे, सरपंच सुजाता मातोंडकर, उपसरपंच ललित वराडकर, प्रियांका रेवंडकर, हरी खोबरेकर, ग्रामसवेक युवराज चव्हाण, भाई मांजरेकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी तेली, किल्ले प्रेरणोत्सवचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, बाळासाहेब परुळेकर, श्रीराम सकपाळ आदी उपस्थित होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण आयुक्‍त यांच्या उपस्थितीत शिवकालाचा प्रसंग निर्माण करण्यात आला होता. नववर्षाचे स्वागत करताना मोरयाचा धोंडा याठिकाणी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांची साकारलेली व्यक्तिरेखा पाहून छत्रपतींच्या काळात असल्याचा आपल्याला भास झाला, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, आयुक्‍तांचा कार्यक्रम असल्याने या परिसरात सुरू असलेला सीफूड फेस्टिव्हलमधील सांस्कृतिक कार्यक्रम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. यामुळे काही रसिकांचा हिरमोड झाला.

Web Title: This is the way to prosperity hygiene