esakal | वनविभागा समोर आंदोलन करू : महेश सारंग
sakal

बोलून बातमी शोधा

sawantwadi

वनविभागा समोर आंदोलन करू : महेश सारंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे तात्काळ काम सुरू करा अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन कोणत्याही क्षणी वनविभागा समोर आंदोलन करू असा इशारा माजी आमदार राजन तेली व भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिला आहे. 

चौकुळ धनगरवाडी भागात गेली अनेक वर्षे पोचली नाही त्या ठिकाणचे लोक वीज नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत आहेत दरम्यान शासनाच्या योजनेतून या ठिकाणी वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र  त्यात येणाऱ्या जमिनीत काम कसे काय करायचे असं प्रश्न वनविभाग करीत असून वीज प्रशासनाला काम करू दिले जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

दरम्यान यापूर्वी तब्बल दोन वेळा या प्रश्नावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते यावेळी वेळेत काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन व नव्याने दिले होते परंतु यात सकारात्मक असेल कोणतेही धोरण ठरविण्यात आले नाही परिणामी हे काम तसेच पडून आहे याबाबत जाब विचारण्यासाठी आज माजी आमदार तेली यांनी उपवनसंरक्षक  समाधान चव्हाण यांची भेट घेतली  वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एकमेकांवर जबाबदारी न करण्याचा प्रयत्न झाला यावेळी संतप्त झालेल्या तेली व सारंग यांनी लोकांचा अंत पाहू नका त्यांना सेवा घ्या अन्यथा तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल असा इशारा दिला एखाद्या गोष्टीसाठी लोकांना तब्बल तीन वेळा यावे लागते हे दुर्दैव आहे असे त्यांनी सुनावले यावरून अधिकारी व पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर आपण हे काम करतो असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र त्याला विरोध करत करतो करून घेतो असे न सांगता तात्काळ या ठिकाणी तुमची माणसे पाठवा सर्वेक्षण करून घ्या सायंकाळपर्यंत काय काम झाले त्याचा आवाज द्या अन्यथा सर्व आम्ही उपोषण करू असा इशारा सारंग यांनी दिला यावेळी वीज कंपनीकडून 94 पोल उभे करण्यात आले आहेत मात्र 12 पोल उभे करण्यात येणारी जमीन जीवनाच्या हद्दीत येत असल्यामुळे त्या ठिकाणी तांत्रिक बाब निर्माण झाली आहे अशी माहिती वीज कंपनीचे अधिकारी महेश गोंधळेकर, भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली. 

दरम्यान पदाधिकाऱ्यांचे रौद्र रूप पाहून चव्हाण यांनी तात्काळ त्या ठिकाणी जा सर्वे करण्याच्या सूचना सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना दिल्या त्यानुसार तत्काळ त्या ठिकाणी जा आपला अहवाल  द्या असे त्यांनी सांगितले त्यावेळी भाजपाचे पदाधिकारी चिडले असाच प्रकार होत असेल तर याबाबत आम्ही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधू असा इशारा दिला आहे. 

तर कारनामे उघड करू...
यावेळी तेली म्हणाले लोकांच्या हितासाठी वन अधिकारी कायद्याचा बाऊ करून योजना रखडून ठेवत असतील तर ते योग्य नाही तब्बल 50 घरे आजही अंधारात आहेत ही गोष्ट जिल्ह्याच्या विकासाला भूषणावह नाही. तांत्रिक बाब दूर करून योग्य ती भूमिका वनविभाग व वीज मंडळाने घ्यावी अन्यथा दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे कारनामे उघड केल्या शिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

loading image