प्लास्टिक मुक्तीसाठी लग्नपत्रिका छापली कापडी पिशवीवर

अमित गवळे
गुरुवार, 21 जून 2018

पाली - प्लास्टिक मुक्तीसाठी अनेक जण सजग व दक्ष झाले आहेत. प्लास्टिक मुक्तीची हि चळवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता समाज प्रबोधन व जनजागृती व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील बलाप येथील जाधव कुटूंबीय व कोलाड येथील थोरात कुटूंबियांनी प्रबोधनात्मक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या व मुलाच्या लग्नाची पत्रिका चक्क कापडी पिशवीवर छापली आहे. त्यांच्या या कल्पनेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

सुधागड तालुक्यातील बलाप गावाजवळ राहणारे बाळासाहेब जाधव यांची कन्या मोनिकाचा विवाह गुरुवारी (ता.२८) आहे. त्या स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहेत. लग्नानिमित्त आपण एखादे प्रबोधनात्मक पाऊल उचलावे असे जाधव कुटूंबियांना वाटत होते.मोनिकाचा भाऊ अमित याला लग्न पत्रिका कापडी पिशवीवर छापण्याची कल्पना सुचली. त्यामुळे प्लास्टिक मुक्तीच्या संदेशाबरोबरच प्लास्टिक पिशवीला योग्य पर्याय मिळेल व आपोआप पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल. हा यामागील उद्देश असल्याचे अमितने सकाळला सांगितले. त्याने हि कल्पना आपल्या घरातल्यांना सांगितली सगळ्यांनीच होकार दर्शविला. एवढ्यावरच न थांबता मोनिकाचे होणारे पती प्रतिक हिंदूराव थोरात यांच्या कुटूंबियांना देखिल हि कल्पना सांगितली त्यांना देखिल ही कल्पना आवडली. मग जाधव कुटूंबियांनी बाराशे तर थोरात कुटूंबियांनी चारशे अशा मिळून एकून सोळाशे कापडी पिशव्यांच्या पत्रिका छापल्या तसेच एका बाजुस प्रबोधनात्मक संदेश आहे. एका पत्रिकेस साधारण दहा रुपये खर्च आला. पण त्याचा प्रभाव मात्र कित्येक पटीने झाला. जिल्ह्यात तसेच त्यांच्या मुळ गावी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यासह अनेक ठिकाणी या पत्रिकारुपी कापडी पिशव्या पोहचल्या आहेत. अनेक जन किराणा सामान, भाजी, कपडे तर कोणी जेवणाचा डबा घेवून जाण्यासाठी या पिशव्यांचा वापर करतांना दिसत आहेत. म्हणजेच प्रदुषण मुक्ती, पर्यावरण रक्षणा बरोबरच लग्नाची तारीख देखील त्यांच्या स्मरणात राहत आहे. असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.

लग्नपत्रिका कितीही महागातली छापली तरी शेवटी टाकुनच दिली जाते. कापडी पिशवीवर पत्रिका छापल्यामुळे सामाजिक संदेश देता आला. समाज प्रबोधन, प्रदुषण मुक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. आमचा हा उपक्रम सर्वांना आवडला आहे. 
मोनिका जाधव, वधू, पाली-बलाप

Web Title: wedding card printed on cloth bag