राजापुरातील कृत्रिम पाणथळ जागांचे सर्वेक्षण

राजापुरातील कृत्रिम पाणथळ जागांचे सर्वेक्षण

राजापूर - तालुक्‍यातील आठ ठिकाणी जैवविविधततेसह पाण्याची क्षारता आणि सामू वेगवेगळे आढळले आहेत. त्याचबरोबर, या ठिकाणी बिबट्या, गवारेड्याच्या ठशांसह विविध प्राण्यांचे ठसे आढळल्याने या प्राण्यांचा वावर आढळला आहे. मानवनिर्मित कृत्रिम पाणथळ जागांचे समितीने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती हाती आली.

समितीमध्ये प्राणी, पक्षी, पर्यावरण अभ्यासक म्हणून धनंजय मराठे, सुधीर रिसबूड, रसायनशास्त्र अभ्यासक प्रा. अभिजित घागरे (राजापूर कनिष्ठ महाविद्यालय), वनस्पतीशास्त्र अभ्यासक म्हणून प्रा. डॉ. अरुण चांदोरे, प्रा. देविदास बोरुडे, प्रा. प्रतीक नाटेकर (आबासाहेब मराठे कॉलेज), प्रा. गिरीश भातडे (राजापूर कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सत्यनारायण देसाई (पाचल कनिष्ठ महाविद्यालय), प्रदूषण तज्ज्ञ म्हणून प्रा. नीलेश मालवणकर (डीएड कॉलेज, राजापूर), दिगंबर किंजळे (वाटूळ हायस्कूल) यांचा समावेश होता.

या समितीने सह्याद्रीचा घाटमाथा परिसरातील पाचल, तळवडे, तिवरे आणि परुळे, तर सागरी किनाऱ्यावरील कोंड्ये, जुवाठी, कशेळी आणि हसोळ भागातील आठ गावांमधील पाणथळ जागांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. त्यामध्ये भौगोलिक स्थितीमुळे प्रत्येक ठिकाणची जैवविविधता, पाण्याची क्षारता त्या-त्या जागाचे वेगळेपण दर्शविणारी आहे.  

काय आढळले

बिबट्यांच्या पायांचे ठसे, साळिंदर, गवा, खवल्या मांजर या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांचे अस्तित्व, विविध प्रजातीचे मासे, शेवाळाच्या प्रजाती, ड्रॅगन फ्लायच्या प्रजाती, विविध प्रजातीचे स्थानिक आणि प्रवासी पक्षी, स्थानिक वनस्पतींसोबत वेगाने वाढणाऱ्या परदेशी वनस्पती.  

‘‘पाणथळ जागांच्या केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली विविध जैवविविधतता निश्‍चितच तालुक्‍याच्या पर्यावरणाचे आणि निसर्गाचे वेगळेपण अधोरेखित करते. या जैवविविधतेचे संवर्धन, संगोपन होणे गरजेचे आहे.’’
- धनंजय मराठे,
पर्यावरणप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com