निशब्द मदत : एक मदत अशीही..

whatsapp group of lanja kokan marathi news
whatsapp group of lanja kokan marathi news

लांजा (रत्नागिरी) : आजचा काळ हा जाहिरातबाजीचा आणि मार्केटिंगचा असल्याने प्रत्येक गोष्टी ची प्रसिद्धी केली जात असते. सोशल मीडिया मुळे तर एकीकडे साध्या साध्या गोष्टीचा इव्हेंट साजरा करण्याची पद्धत रूढ झाली असताना दुसरीकडे
सोशल मीडियाचा जबरदस्त वापर, आणि अत्यंत निस्वार्थी सेवा कुठेही फोटो नाहीत, दिल्या घेतल्याचे सोपस्कार नाहीत अश्या पद्धतीने लांजा मध्ये काम करीत असलेला उई दि पिपल ऑफ़ लांजा हा WhatsApp ग्रुप अखंड लांजा तालुक्याचा औत्सुक्यतेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

लांजातील समस्यावर आणि विकासावर व्यापक चर्चा करणे, एकमेकांच्या संपर्कात राहून अडचणीत एकमेकांना मदत करणे अश्या व्यापक उद्देशाने हा ग्रुप  एडमिन.अभिजित जेधे यांच्या संकल्पाने निर्माण करण्यात आला. लांजा मधील अनेक वैचारिक प्रगल्भ असणारे प्रतिष्ठित नागरिक या ग्रुपचे सदस्य आहेत.सुमारे २२६ सदस्य संख्या असलेला हा ग्रुप नेहमीच विधायक कामात चर्चेत असतो.

असा करतो ग्रुप काम

कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता एकिकडे प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असताना we the people of LANJA हा गृप एकंदरीत प्रशासनाला काय काय मदतीची गरज आहे याचा आढावा घेत सक्रिय झाला. सर्व प्रथम या विषाणूंचा धोका आणि त्याबाबत आवश्यक असणारी जनजागृतीची मोहीम सर्वप्रथम या ग्रुपने हाती घेतली. बाजारपेठ मधील गर्दी कमी करण्यासाठी थेट लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सोशल डिस्टिंक्शन चे महत्त्व पटवून देणे, बाहेर गावाहून आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे, इत्यादी बाबतीत प्रशासनाला सर्व प्रकाराचे सहकार्य या ग्रुप मार्फत करण्यात आले.

एकीकडे जनजागृती बाबत काम सुरू असताना आवश्यक व गरजू लोकांची माहिती गोळा करणे व त्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी या ग्रुपने कमालीची तत्परता दाखवली. यासाठी या गृप सदस्यांनी स्वइच्छेने वर्गणी काढून त्यातून गरजू लोकांना अत्यावश्यक असणारे धान्य सामुग्री, साबण, व इतर अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तू घरपोच पोहोचविल्या. या सामुग्री चे वाटप करताना सुद्धा साधारणपणे किती काळ लॅाकडाऊन राहील याचा विचार करून हवी तेवडी मदत करण्यात हा ग्रुप यशस्वी ठरला.या शिवाय प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत करण्यास देखील या ग्रुपने पुढाकार घेतला आहे आणि आजही ही मदत अविरत चालू आहे.

अशी ही विश्वासर्हाता

आता अनेक कुटुंबांना आणि शेकडो लोकांना थेट मदत ऊपलब्ध करून देऊनही उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये या उक्तीप्रमाणे या मदतीचा कुठेही गाजावाजा व चर्चा सुद्धा या ग्रुपने केलेली नाही. शेकडो माणसांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहणारा हा whatapp ग्रुप  त्यामुळेच लांजा तालुक्याचा कौतुकाचा विषय ठरला आहे.अॅडवोकेट अभिजीत जेधे(ग्रुप एडमिन)-  हा ग्रुप स्थापन करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आपण गुड मॉर्निंग, शुभेच्छा यांच्यासाठी ग्रुप तयार केला नसल्याचे स्पष्ट केले होते ,समाजकार्यासाठी हा ग्रुप असून ज्याला कोणाला अडचण वाटत असेल तर त्यांनी बाहेर पडावे असे त्यावेळी स्पष्ट केले होते.

मात्र तरीही समाज सेवेच्या भावनेतून 226  सदस्य या ग्रुपमध्ये राहिले. मदतीचे आवाहन करताच सुमारे शंभर सदस्यांनी तात्काळ रक्कम माझ्या खात्यावर जमा केली दररोज कोणी किती रक्कम दिली ?किती जणांना वस्तू रुपात वाटप केले? कोणाला वाटप केले? याची माहिती आपण ग्रुपवर देत आहोत. किती रक्कम आणि खर्च किती झाली? याचा हिशोब सुद्धा मी ग्रुपवर देत असल्याने सर्व सदस्य समाधानी असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com