माउली कसलीच चिंता करू देत नाहीत...

मकरंद पटवर्धन
शनिवार, 21 जुलै 2018

रत्नागिरी : दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यावर वारी करायची हा नेम 12 वर्षे ठरलेला. आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर माउलींची पालखी निघते. त्याच्या वेळापत्रकानुसार दरवर्षी नवा टप्पा ठरवतो. या ठिकाणी आधी दोन महिने जाऊन पाहणी करतो आणि नियोजन होते. मनोभावे वारी केल्यावर वर्षभर माउली आम्हाला कसलीच चिंता करू देत नाही, हा अनुभव सांगत होते सतीश काळे.

ते म्हणाले की, वारी आयुष्यभर करावी. किमान आम्ही करतो तसा एक तरी टप्पा करावा. आळंदीतून कार्यक्रम पत्रिका आल्यावर टप्पा ठरवतो. त्या ठिकाणाला भेट देऊन निवास व अन्य सोय पाहतो. चालायचा टप्पा किती मोठा पाहून नियोजन करतो. नवे ठिकाण असल्याने काही अडचणी येतात. पण त्यावर लगेच उत्तरे सापडतात. फलटणला पार्किंगसाठी 6 किमी जावे लागले. दुसर्‍या दिवशी 6 किमी जाण्यासाठी पटापट रिक्षा मिळाल्या आणि वेळ वाचला. माझी मुलगी सारा सातवीत आहे. ती व पत्नी सौ. साक्षी या माझ्यासोबत पाच वर्षे वारी करत आहेत. ती दिवेघाट 7 किलोमीटर चालली. मंदार मोरे यांची मीरा व मेघ ही मुलेसुद्धा वारीत दरवर्षी येत आहेत.

आज वाखरीचा टप्पा
परवा माउली ग्रुपसोबत वारी करून आज वैभव हेळेकर, सुयोग मोरे, गौरव हेळेकर या मित्रांना घेऊन सांगोला येथे आलो आहे. शनिवारी (ता. 21) सकाळी भंडीशेगाव ते वाखरी हा पालखी सोहळ्याचा अंतिम टप्पा करणार आहोत. माउली गाण्यातील रिंगण पाहण्यासाठी अनेकजण येथे येतात.

ओलेचिंब होऊन जेजुरीगडावर
पालखी सोहळ्यावेळी दोन वर्षांपूर्वी जेजुरीगडाचे दर्शन घेण्यास निघालो. लॉज न मिळाल्याने कोणी आंघोळ केली नव्हती. गडाची पहिली पायरी चढायला सुरवात केल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला ओलेचिंब होऊन दर्शन घेतले.

Web Title: when mauli is there no need to worry