कडधान्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लक्ष्मण डुबे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) रसायनी परीसरात रब्बीच्या हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढु लागले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसु लागला आहे. खराब हवामानामुळे वालावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. 

खरीपाच्या भात पिका नतंर वडगाव, आपटे, सावळे, मोहोपाडा, चावणा पंचक्रोशीतील शेतक-यांनी रब्बीच्या हंगामात वाल, हरभरा, मुग, चवळी आदि कडधान्यांच्या पिकांची पेरणी शेतकरी करत आहे. वाल आणि इतर कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने परीसरात कडधान्याच्या पेरणीचे क्षेत्रफळ मागील दोन तीन वर्षा पासुन वाढू लागले आहे. 

दरम्यान खरीपाच्या हंगामातील भात पिकाच्या कापणी नंतर शेतक-यांनी कडधान्यांच्या पेरण्या केल्या आहे. मात्र त्यानंतर चार नोव्हेबर रोजी रात्री पाऊस झाला. परिसरात या पावसापुर्वी सुमारे तीस टक्के  शेतक-यांची पेरणीची काम झाली होती. त्यांच्या पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पेरणी केलेले वालाची व कडधान्यांची बियांणे व रोप कुजून गेले आहे. दुबारा पेरणी करावी लागली असे अशोक मांडे व इतर शेतक-यांनी सांगितले. तर काही ठिकाणी वालावर बामणी रोग पडला अाहे. त्यामुळे वालाचे पिक पिवळे पडल्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहे. 

Web Title: whether is not good for crops in rasayni