रायगडचा सुभेदार कोण?

प्रणय पाटील - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पक्षीय बळाबरोबरच नेत्यांचा वैयक्तिक करिश्‍मा निकालातून जोखला जाणार आहे...

अलिबाग - राज्यात वैशिष्ट्यपूर्ण राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्हा परिषदेचा नवा सुभेदार कोण, याचा फैसला गुरुवारी (ता. २३) मतमोजणीतून होणार आहे. 

सत्तारूढ शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेवरील मांड टिकवून ठेवते, की आघाडीला शिवसेनेकडून जोरदार धोबीपछाड दिला जातो, हे पाहणे उत्कंठावर्धक ठरले आहे. या जंगी सामन्यात काँग्रेस, भाजपची उडी कुठवर जाते, याचीही उत्सुकता आहेच. या सर्व पक्षीय समीकरणांशिवाय वैयक्तिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते, काँग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार माणिक जगताप, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. तटकरे व जयंत पाटील या दोन नेत्यांभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत आहे. त्यांच्यापुढे गीते यांनी आव्हान उभे केले अाहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची लढाई न राहता या नेत्यांची लढाई बनली आहे.

Web Title: Who is the governor of Raigad