रत्नागिरीतील 'या' आमदारांना मिळणार मंत्रिपदे?

Who Will Get Ministry Post In Ratnagiri News
Who Will Get Ministry Post In Ratnagiri News

रत्नागिरी - सत्तानाट्याचा दुसरा अंक संपला आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यालाही मंत्रिपदाची आस लागली आहे. शिवसेनेकडून उदय सामंत आणि राष्ट्रवादीकडून शेखर निकम ही दोन्ही नावे चर्चेत आहेत. पूर्वीच्या नगरविकास राज्यमंत्रिपदाचा अनुभव, विधानसभा निवडणुकीत केलेली चमकदार कामगिरी, शिवसेना उपनेते आणि मातोश्रीशी असलेल्या जवळीकमुळे सामंत यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याबरोबर भास्कर जाधव, राजन साळवी हे देखील या स्पर्धेत आहेत. 

शिवसेनेने भाजपचा हात सोडून पारंपरिक विरोधक असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. मात्र लवकर पेच न सुटल्याचा फायदा घेऊन अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. यामुळे जिल्ह्याला मिळणाऱ्या मंत्रिपदाच्या आशा पूर्ण मावळल्या होत्या. शिवसेनेकडून उदय सामंत, भास्कर जाधव, राजन साळवी यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांना लॉटरी लागण्याची शक्‍यता होती. मात्र या घडामोडीमुळे सर्व आशेवर पाणी फिरले अन्‌ पुन्हा चित्र पालटले.

हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत

फडणवीस यांनी अल्पावधीत पदांचा राजीनामा दिला. पुन्हा महाविकास आघाडीमध्ये उत्साह संचारला. काल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. भास्कर जाधव, राजन साळवी, रामदास कदम हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शेखर निकम या जिल्ह्यातील एकमेव आमदारांना देखील संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

नऊ खात्यांचा कार्यभार समर्थपणे पेलला 

उदय सामंत यांनी यापूर्वी नगरविकास खात्यासह 9 खात्यांचा कार्यभार समर्थपणे पेलला होता. आता ते म्हाडाचे अध्यक्ष आहेत. त्यातही त्यांनी चांगले काम केले. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्‍य घेऊन निवडून येणारे ते कोकणातील एकमेव आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सामंत यांनी पेलली. शिवसेना उपनेते आणि मातोश्रीच्या जवळ असल्याने मंत्रिपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com