शिवसेनेचे मंत्री सरकारचे लाभार्थी का होतात  :  प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

कणकवली : सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री विरोध करून आमदार कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करत आहे. मात्र सरकारमध्ये राहून मंत्री पदे उपभोगायची आणि सरकारे लाभार्थी बनून जनतेच्या डोळात धुळ फेकायची. त्यापेक्षा सत्तेचा त्यागकरून दाखवा असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज येथे शिवसेनेला दिले आहे.

कणकवलीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यासह काल (ता. 25) इंधनदरवाढी विरोधात येथे रास्तारोखो केले होते. त्यानंतर एका पत्रकार परिषदेतून भाजपवर टीका केली होती. यावर बोलताना जठार म्हणाले, कणकवलीच्या निवडणूकीत प्रभाग दहा मध्ये शिवसेनेने स्वाभिमानला थेट मदत केली. त्याचा वचपा आमच्या लोंकानी कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघात काढला. त्यामुळे नाईक यांनी भाजपला निष्ठेची भाषा शिकवू नये, आता पालघर ही शिवसेनेच्या पाठीवरची शेवटची काडी आहे. राजकारणात आता काही करावे लागते. ते सध्याच्या राजकारण अपरिहार्य आहे. ते भाजपने केले. याहीपुढे सगळ्या राजकीय पक्षांना ती भूमिका घ्यावी लागणार असल्याचा टोलाही जठार यांनी शिवसेनेला लगवला आहे.

  • राणेच्या रूग्णालयाला शुभेच्छा 

जिल्हात विकासाचे जे चांगले काम होत आहे. त्याला भाजपचे नेहमी सहकार्य राहीले आहे. त्यामुळे खासदार नारायण राणे जे रूग्णालय सुरू करत आहे. त्याला भाजपच्या उघडउघड शुभेच्छा आहेत.

  • राज ठाकरेच्या नातेवाईकांची नाणारला गुंतवणूक

नाणार प्रकल्पाला विरोध करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नोतावईकांची जमीन खरेदीकरून गुंतवणूक केली आहे. त्याचे पुरावे मी सादर करू शकतो. तसे पहता राज्यात राज ठाकरेना राजकारण कोणीही फारसे गृहीत धरत नाहीत अशी टिकाही जठार यांनी केली आहे.
 
Web Title: Why the shivsena minister becomes the beneficiary of the government said promod jathar