दारू, पैशावर पोलिसांची नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - आगामी निवडणुकांमध्ये दारू व पैशाचा वापर होऊ नये म्हणून या दोन्ही गोष्टींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. गोव्यातून होणारी अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. निवडणूक काळात बाहेरून ३०० जादा पोलिस मागविण्यात आले आहेत. ही माहिती पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आज येथे दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक गावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘२१ फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. निवडणुका शांततेत निर्भयपणे पार पडाव्यात यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्याबाहेरील ३०० हून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि १५० होमगार्डची जादा कुमक मागविण्यात आली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘निवडणूक कालावधीत होणारा दारू आणि पैशाचा वापर यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही तपासणी नाक्‍यावर काटेकोरपणे वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. 

आवश्‍यक त्या ठिकाणी नाकाबंदी सुरू राहणार आहे. निवडणुकीसाठी जादा वाहने व मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. फिरत्या पथकाद्वारेही जिल्ह्यातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

त्याशिवाय वेंगुर्ले, मालवण आणि सावंतवाडी येथे सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. ती तात्काळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण 
ठेवण्यासाठी खास पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्‍यक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. 

जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने निवडणुकीचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी येथील जनतेने सहकार्य करून कोणतेही अनुचित प्रकार अथवा मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी दारू आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून आल्यास मोबाइल ॲपद्वारे अथवा संपर्क करून तत्काळ पोलिस यंत्रणेला 
माहिती द्यावी.’’

Web Title: wine money watch by police in election period