दाभोळ : मुंबई येथून गणपतीसाठी दोन दिवसांपूर्वी गावी आलेल्या एका 55 वर्षीय महिलेचा नदीकिनारी कपडे धूत असताना पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिर्दे येथे घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिर्दे पूर्व वाडी येथील मीनाक्षी मनोहर खळे ही 55 वर्षीय महिला भोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या सूर्या नदीकिनारी आज दुपारी 11 वाजता कपडे धुण्यासाठी एकटीच गेली होती, ती बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतली असता तिचा मृतदेह नदीमधील एका झाडात अडकलेला आढळला, या घटनेची माहिती दापोली पोलिसांना दिल्यावर उपनिरीक्षक निनाद कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघ, हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, वैशाली सुकाळे आदीनी शिर्दे येथे धाव घेतली, ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
गेले दोन दिवस दापोली तालुक्यात अतिवृष्टी झालेली असून तालुक्यातील सर्व नद्या दुथडीभरून वाहत असून या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात ही महिला वाहून गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे, गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ही घटना घडल्याने शिरदे पूर्ववाडीत शोककळा पसरली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.