कणकवली पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

Woman Suicide Attempts At Kankavali Police Station
Woman Suicide Attempts At Kankavali Police Station

कणकवली - पतीने मारहाण केली, अशी फिर्याद देण्यासाठी आलेल्या एका जखमी महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज येथील पोलिस ठाण्याच्या आवारातच घडला. गीतांजली देवदूत मिठबावकर (वय 32, रा. कलमठ) असे तिचे नाव आहे. गंभीर अवस्थेत गीतांजली यांना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी 11 वाजता घडला; मात्र याबाबत उशिरापर्यत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती. 

गीतांजली यांच्या उजव्या हाताला जखम होवून रक्त वाहत होते. त्यामुळे पोलिसांनी पत्र देत उपचार करुन या, असे सुचविले. संतप्त झालेल्या महिलेने काही क्षणात पोलिस ठाण्याच्या आवारातच न्याय न मिळत असल्याची भावना करुन फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या जागीच खाली कोसळल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पोलिसांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तक्रार देताक्षणी गीतांजली यांना व्हॅनमधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांसोबत पाठविले असते तर हा प्रकार टळला असता. 

पोलिस अंमलदारांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून उपचार करुन या, त्यानंतर तुमच्या तक्रार अर्जावर कारवाई करुया, असे त्या महिलेला सांगितले. रागाच्या भरात गीतांजली यांनी फवारणी करण्यात येणारे किटकनाशक पोलिस ठाण्याच्या आवारात प्राशन केले. काही क्षणात विषबाधा होवून त्या जमिनीवर कोसळल्या. त्यापूर्वी त्यांनी भावाला दूरध्वनी करून मी विष घेतल्याचे कळविले. गीतांजली यांच्या भावाने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कणकवली पोलिसांनी गीतांजलीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.  

आणखी वाचा - 

दोडामार्ग तालुका गोव्यामध्ये विलिन करण्याच्या मागणी मागे आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com