सव्वाकोटी अपहार प्रकरणी सिंधुदुर्गात महिला संचालक अटकेत 

Women Director Arrested In Sindhudurg In Fraud Case News
Women Director Arrested In Sindhudurg In Fraud Case News

कणकवली - तालुक्‍यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेला शासनाने 98 लाख 96 हजार 640 रुपयांचा निधी दिला होता. सभासदांकडून 23 लाख 70 एवढे भागभांडवल जमा होते. एकूण एक कोटी 22 लाख 66 हजार 640 रुपयांच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी संस्थेच्या संचालक प्राजक्ता प्रकाश कदम (वय 50) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अपहार प्रकरणी अन्य 12 जण संशयित असून त्यांनाही अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान शासनाने दिलेल्या 98 लाख 96 हजार 640 निधी पैकी 90 लाखाची रक्‍कम इचलकरंजी येथील शिंदे नावाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्या रक्‍कमेचे काय झाले, याचाही शोध पोलिस घेत आहेत. ओरोस येथील उपलेखा परीक्षक प्रशांत बळीराम दळवी यांनी या अपहाराची फिर्याद सात जानेवारी 2019 ला कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. यामध्ये सुमारे एक कोटींचा अपहार स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन संचालक प्राजक्‍ता कदम यांच्यावर अटकेची कारवाई झाल्याची माहिती सरकारी वकील ऍड. गजानन तोडकरी यांनी दिली. 

निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला नसल्याचे निष्पन्न

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेला शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून संस्थेला 98 लाख 96 हजार 640 रुपयांचा निधी दिला होता. संस्थेकडे एक कोटी 22 लाख 66 हजार रुपये एवढे भागभांडवल होते. एकूण एक कोटी 22 लाख 66 हजार 640 रुपयांच्या निधीच्या विनियोगाबाबत उपलेखापरीक्षक प्रशांत बळीराम दळवी (रा.ओरोस) यांनी तपासणी केली. त्यावेळी या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला नसल्याचे निष्पन्न झाले.

बोगस कामे दाखवून अपहार

संशयित प्राजक्‍ता प्रकाश कदम यांनी इतरांच्या मदतीने भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. यात काही बोगस सभासद तयार केले आणि शासनाकडून 98 लाख रुपयाच्या अनुदानाची उचल केली. बोगस कामे दाखवून एकूण एक कोटी 22 लाख 66 हजार 640 रक्‍कमेचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. बर्वे यांनी आज प्राजक्‍ता कदम यांना ताब्यात घेऊन कणकवली न्यायालयात हजर केले. 

पोलिस कोठडीची मागणी

भीमरत्न संस्थेत एवढ्या मोठ्या रक्‍कमेचा अपहार कसा झाला, यात कितीजण सहभागी आहेत, सव्वा कोटी रक्‍कमेचे काय झाले, संस्थेसाठी बोगस कागदपत्रे कुणी दिली या सर्वांचा तपास होण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार कदम यांना कोठडी सुनावण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com