रत्नागिरीत यिनच्या निवडणुकीत चुरशीने मतदान

रत्नागिरीत यिनच्या निवडणुकीत चुरशीने मतदान

रत्नागिरी - सकाळ मीडियाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची निवडणूक आज गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवनिर्माण महाविद्यालयात उत्साहात झाली. युवा नेतृत्व निवड आणि राज्यस्तरावर संधी देणार्‍या या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. येथे निखील सचिन आचरेकर, नेहा अभय गोखले, स्वरूप मिलिंद काणे, इशिका सुरेश कोरवी, ऋत्विक देविदास पाटील, अनुष्का दिलीप तांबे, सारिका प्रदीप पाटणकर, कैलास कृष्णन् पिल्लई हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत 8 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. निवडणूक प्रक्रियेसाठी प्र. प्राचार्य डॉ. यास्मिन आवटे यांच्यासमवेत उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. विवेक भिडे व कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील प्राध्यापकांनी सहकार्य केले. नवनिर्माण महाविद्यालयात प्र. प्राचार्य सुकुमार शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. येथे 5 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी यिनचे प्रतिनिधी अवधूत गायकवाड, सकाळचे राजू चव्हाण, राजेश शेळके, मकरंद पटवर्धन, राजेश कळंबटे, दत्तप्रसन्न कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com