सेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग फुसका - योगेश कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

भगव्याशी गद्दारी केलेल्यांना शिवसैनिक कधीही सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवा नेते योगेश कदम यांनी केले.

खेड - सेनेचा बालेकिल्ला असलेल्या घोगरे गावात गेल्या चार वर्षापासून काही जणांनी बाहेरून येऊन सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. येथील ग्रामस्थांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही बहाद्दरांनी फुकाची आश्‍वासने देऊन तीन-चार वर्षे दिशाभूल चालविली आहे. परंतु भगव्याशी गद्दारी केलेल्यांना शिवसैनिक कधीही सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवा नेते योगेश कदम यांनी केले.

ते घोगरे गावातील पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कदम म्हणाले की, दापोली-खेड-मंडणगड या विधानसभा मतदारसंघातील वातावरण पुन्हा भगवेमय होत असल्यामुळे या बहाद्दरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापुढे आमचे शिवसैनिक- युवासैनिक अशा गद्दारांना माफ करणार नाहीत. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडणार नाहीत.

यावेळी घोगरे येथील नामदेव जाधव , सुमन जाधव, दशरथ जाधव, लक्ष्मण जाधव, दिलीप कडू , मनोहर जाधव, बाबाराम सोनवटकर, विनोद सोनवटकर, तुळशीराम पवार, शांताराम पवार, नितीन सोनवटकर, लक्ष्मी सोनवटकर, संतोष जाधव, सुरेश कदम, जयवंती कदम, अनिल शिंदे, रामजी पवार, नरेश जाधव, पुष्पा पिंपळकर, गणू जाधव, आत्माराम जाधव, सुनीता जाधव, अनिता उतेकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी चंद्रकांत कदम, शंकर कांगणे, सौ. अपर्णा नक्षे, विजय कदम, सौ. सुप्रिया पवार,  विजय जाधव, शांताराम म्हसकर, श्रीकांत शिर्के, रवींद्र मोरे, शामराव मोरे, सुखदेव पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Yogesh Kadam comment