'लाल दिव्याच्या गाडीसाठी गद्दारी करणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये'

, nilesh rane
, nilesh raneGoogale

खेड (रत्नागिरी) : शिवसेने मधून नारायण राणे (Narayan Rane)बाहेर पडले तेव्हा काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादीत रामदास कदम (Ramdas Kadam)यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. असा आरोप माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला पलटवार करतांना दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले की, लाल दिव्याच्या गाडीसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या राणे कुटुंबीयांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही.

गेल्या दहा वर्षात फक्त आणि फक्त मंत्रिपदाच्या लालसेपोटी पहिल्यांदा काँग्रेस तिथून स्वाभिमान पक्ष आणि त्यानंतर स्वतः चा स्वाभिमान गहाण ठेवून पुन्हा भाजप अशी वारी करणाऱ्या राणेंनी रामदास कदम यांच्यावर आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे.

, nilesh rane
Weather Update : केरळात धुवाधार ; 'या' आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

नारायण राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर शिवसेना नेते पदाची धुरा दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यामध्ये रामदास कदम यांची मुख्य भूमिका होती. कदम यांना विरोधीपक्ष नेतेपद दिले. पक्षाने भाईंना खुप दिले आहे. राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यावेळी रामदासभाईंची आणि राणे यांची कधी भेटच झाली नाही. त्यामुळे महाड पर्यत आले आणि परत गेले या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राणे यांनी विरोधीपक्ष नेते पद सोडल्यानंतर बऱ्याच कालावधी नंतर भाईंची पक्ष नेतृत्वांने विरोधीपक्ष नेते पदी निवड केली. त्यामुळे कॉंग्रेसच्या यादीत कदम पहिले होते अशी पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी आपली पत पक्षांमध्ये वाढविण्यासाठी केलेले हे नाटकंच आहे.

अशा संधी साधूनां कोकणातील जनता चांगलीच ओळखून आहे. राहिला प्रश्न पालकमंत्री अँड अनिल परब यांचा त्या क्लिप्सचा, आमची भांडणं आमच्या एका घरातील आहेत. ती आम्ही एकत्र घरात बसून सोडवू यासंदर्भात निलेश राणे यांना तसदी घेण्याची गरज नाही. ज्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्वच गोष्टी भरभरून दिल्या त्यांनी केवळ आणि केवळ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्षनेतृत्वावर बिनबुडाचे आरोप करीत पक्ष सोडला. त्यांच्याकडून आम्हाला स्वाभिमानाचे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com