तरुण दिग्दर्शक, निर्माते व लेखक सचिन गोळे यांची यशस्वी घोडदौड

अमित गवळे
मंगळवार, 29 मे 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तरुण दिग्दर्शक, निर्माते व लेखक सचिन गोळे यांच्या " बायस्टँडर इफेक्ट" या शॉर्टफिल्मची एमएच 20 फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतीच निवड झाली आहे. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही शॉर्टफिल्म सचिन गोळे जवळपास 200 शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये दाखविणार आहेत.

सचिन यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही बाजी मारली. या शॉर्टफिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केल आहे. त्यांचे मूळ गाव सुधागड तालुक्यातील शिळोशी हे असून सध्या ते ठाणे येथे वास्तव्यास आहेत.

औरंगाबाद येथील फेस्टिवलसाठी 15 मे रोजी त्यांच्या शॉर्टफिल्मचे ऑफिसियल सिलेक्शन झाले. 18 मेला त्यांना शॉर्टफिल्मच्या स्क्रीनिंगसाठी  आमंत्रित केले गेले. रविवारी (ता. 20) सायंकाळी मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे "लागीर झालं जी" या मराठी  सिरीयलमधील कमांडरच्या भुमीकेतील आणि महासत्ता या चित्रपटात अभिनय केलेले जेष्ठ अभिनेते  रणजीत रणदिवे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.

सबंध देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना दिवसागणीक वाढत आहेत. त्याबद्दल समाजात संवेदनशीलता निर्माण होऊन ठोस उपाय करण्यात यावेत हा या शॉर्टफिल्म मागील हेतु आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.
- सचिन बबनराव गोळ, निर्माते व दिग्दर्शक

आगामी प्रोजेक्ट
सचिन गोळे गेली 6 वर्ष  'उत्तर मिळेल का ? हा सामाजिक संदेश देणाऱ्या  मराठी चित्रपटाच्या निर्मिती वर काम करीत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी साधारण: हा एप्रिल महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

शिवाय एका मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहेत. या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण येत्या 1 जून पासून नाशिक आणि अहमदनगर येथे चालू होणार आहे.
 
Web Title: young director producer writer sachin gole story