कळी उमलताना,युवा गायक प्रथमेश लघाटेचा उलगडला गानप्रवास

प्रमोद हर्डीकर
Thursday, 18 February 2021

रत्नागिरीच्या संवादिका सौ.दीप्ती कानविंदे यांनी गप्पा गोष्टीतुन प्रथमेशला बोलते केले.चतुरंग प्रतिष्ठान व देवरुख अभिरुची तर्फे हा मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच रंगला.

साडवली (रत्नागिरी)  : पुर्वी केवळ छंद म्हणुन गाणे गायले जायचे मात्र आता गाणे व्यावसायिक रुप घेवु शकते हे आता सगळ्यांना माहित झाले आहे. त्यासाठी रियाज आणि गुरुंकडे शिक्षण घेणे महत्वाचे आहे . चिपळुण येथे श्री व सौ.सतीश कुंटे यांच्याकडे  गायनाचे धडे गिरवत व  सारेगामा रियालिटी स्पर्धेसाठी तयार झालो.  रियालिटी शो मधुन पुढे आलेला व महाराष्ट्राचा आघाडीचा युवा गायक बनलेल्या प्रथमेश लघाटेचा गानप्रवास देवरुख येथे मुक्तसंध्या मुलाखतीतुन उलगडला. 

रत्नागिरीच्या संवादिका सौ.दीप्ती कानविंदे यांनी गप्पा गोष्टीतुन प्रथमेशला बोलते केले.चतुरंग प्रतिष्ठान व देवरुख अभिरुची तर्फे हा मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच रंगला. प्रास्ताविकात भक्ती गद्रे हीने चतुरंगचा आढावा घेवुन हा १५० वा कार्यक्रम असल्याचे सांगितले.कळी उमलताना या शिर्षकाखाली ही मुलाखत रंगताना प्रथमेशने लहानपणापासुनचा गायनाचा प्रवास व किस्सेकथन केले. यावेळी प्रथमेशने आरवली येथे आमच्या घरी दर गुरुवारी भजन करण्याची ९१ वर्षाची परंपरा आहे .या भजनातुनच माझ्यावर लहानपणापासुन संस्कार झाले.गाण्याची गोडी लागली व घरच्यांनी मला पाठींबा दिला व तिथुनच माझा गाण्याचा प्रवास सुरु झाल्याचे प्रथमेशने सांगितले.

पुर्वी केवळ छंद म्हणुन गाणे गायले जायचे मात्र आता गाणे व्यावसायिक रुप घेवु शकते हे आता सगळ्यांना माहित झाले आहे. त्यासाठी रियाज आणि गुरुंकडे शिक्षण घेणे महत्वाचे आहे असे प्रथमेश म्हणाला. चिपळुण येथे श्री व सौ.सतीश कुंटे यांच्याकडे मी गायनाचे धडे गिरवले व सारेगामा रियालिटी स्पर्धेसाठी मी तयार झालो.यावेळी कुंटेसरांबरोबरच पराग लघाटे,प्रसन्न लघाटे,राजा केळकर,चैतन्य पटवर्धन,उदयराज सावंत,सचिन भावे,राजु धाक्रस,मिलींद टिकेकर,यांनी मला गायक घडवण्यास मदत केली.डाॅ,विकास कशाळकर,प्रसाद गुळवणी,पंडीत सुरेश बापट,जयतीर्थ मेवुंडी हे गुरु म्हणुन मला लाभले असे सांगत प्रथमेशने लहानपणी ऐकलेले अभंग,भावगीते,भक्तीगीते मला गायनप्रवासात उपयोग यावेळी उपयोगी ठरली असे सांगितले.

हेही वाचा- पुन्हा निर्बंध कडक ; मास्क न वापरणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर असा होणार दंड -

मंदार कारुळकर यांचेकडे आवाजासाठी शिक्षण घेतले.आता विविध ठिकाणी गायनाच्या मैफली होत असतानाच गायनाचे सगळेच फाॅर्म मी हाताळतो आहे .तसेच आपण कंपोझर म्हणुन सुरुवात केली आहे .असे सांगत युट्युबवर प्रसिद्घ झालेले गाणे  चिमणी एव्हढा जीव हे प्रथमेशने ऐकुन दाखवले. परदेशवारीतील अनुभवही प्रथमेशने कथन केले.

रसिकांचे अनुभव कसे येतात या दीप्ती कानविंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रथमेशने सांगितले की सारेगामा सुरु असताना दोनशेच्या आसपास पञे आली त्यामध्ये दोन प्रसंग फारच भावनिक होते यात एका आईने सांगितले होते की आमचा मुलगा दोन वर्ष झाली तरी हसलेला नव्हता माञ तु गायलेले दत्त दर्शनला जायाचे आणि जायाचे हे गाणे ऐकुन तो हसायला लागला असे पञात लिहीले होते.

हेही वाचा- कोकणात कोरोना रुग्णात वाढ ;  नियम न पाळल्यास डायरेक्ट होणार गुन्हा दाखल

 दुसरा प्रसंग म्हणजे एका आजोबांनी सांगितले की माझी पत्नी अंथरुणाला खिळली होती ती प्रथमेशची गाणी ऐकुन घरात वावरायला लागली असे दोन प्रसंग प्रथमेशने कथन केले.
लाॅकडावुन आधी माझा सुरु असलेला पंचतत्व हा कार्यक्रम आता परत सुरु होणार आहे तर आनंद भाट्ये यांच्या समवेत मी गायलेले पांघरुण चिञपटातले गीत इवलासा देह,किती खोल डोह,स्नेह प्रेम मोह मांदियाळी हे रसिकांना आता ऐकायला मिळणार आहे असे प्रथमेश म्हणाला.

यावेळी प्रसन्न लघाटे यांनी प्रथमेशला गाण्यामुळे इतर खेळ त्याला खेळता आले नाहीत माञ गायनकलेत त्याने नैपुण्य मिळवले हे लघाटे कुंटुबाला अभिमानाची गोष्ट वाटते असे सांगितले.
मुलाखतीच्या प्रारंभी प्रथमेश लघाटे,दीप्ती कानविंदे, उद्योजक अमोल लोध,राम देशपांडे,प्रमोद हर्डीकर,यांच्याहस्ते दिपप्रज्वलन झाले.प्रथमेशला सूरजोत्स्ना पुरस्कार मिळाल्याबद्दल समीर आठल्ये यांनी लिहीलेले सन्मानपञ आशिष प्रभुदेसाईंच्या हस्ते देण्यात आले.मंगेश प्रभुदेसाई यांनी आभार मानले. 

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young singer prathamesh laghate interview in sadavali ratnagiri marathi news