तरुणीची पोलिस भरतीत अपयशाने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

कणकवली - पोलिस भरतीत निवड न झाल्याने कलमठ येथील एका तरुणीने काल आत्महत्या केली. प्रियांका वामन हरकुळकर  (वय २०) असे तिचे नाव आहे. तिने आपले मूळ गाव हरकुळ खुर्द, चव्हाणवाडी येथे बंद असलेल्या जुन्या घरातील चौकात (माडी) आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला असावा, असे कणकवली पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी सांगितले, की जिल्हा पोलिस भरतीत निवड न झाल्याने प्रियांकाचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. प्रियांका कलमठमध्ये राहते. अलीकडे पोलिस भरतीसाठी ती प्रयत्नशील होती. पोलिस भरतीत निवड न झाल्याचे तिला गेल्या आठवड्यात कळाले. त्यानंतर ती निराश झाली होती. सोमवारी सकाळी ती कलमठमधून आई आणि भावाला ओरोस येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. सायंकाळी पाचपर्यंत ती घरी आली नाही म्हणून तिचा शोध सुरू झाला. मोबाइलही स्वीच ऑफ होता. त्यामुळे आई आणि भाऊ तिला शोधण्यासाठी हरकुळ खुर्द येथे पोचले; तेव्हा घराचा पुढील दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले तर प्रियांका गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आली. यानंतर पोलिस पाटलांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर हा सारा प्रकार उघड झाला. याबाबत महेश वामन हरकुळकर यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यातून पोलिस भरतीतील अपयश हेच कारण असल्याचे पुढे आले आहे.

Web Title: Young woman committed suicide in police recruitment