पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील करजगाव येथील तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. दापोली पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. करजगाव येथील प्रकाश शंकर बडबे (वय 40) हे शनिवारी (ता. 24) रात्री दुचाकीवरून करजगाव येथून दापोलीकडे जात होते. जानेश्‍वर वाडीकडे जाणाऱ्या पुलावर आले होते. त्यातून त्यांनी दुचाकी पाण्यातून नेली. मात्र, पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेले. आज दुपारी बडबे यांचा मृतदेह नदीच्या पाण्यात आढळून आला. त्यानंतर ही खबर दापोली पोलिसांना देण्यात आली.

Web Title: As a youth died in the floods washed away

टॅग्स