युवा छावणीत युवकांना सापडली जगण्याची नवी दिशा

अमित गवळे
शुक्रवार, 18 मे 2018

पाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आयोजित युवा छावणी 2018 या 7 दिवसीय निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला. दरवर्षी छावणीतील वेगवेगळ्या थीमसह स्वभान ते समाजभान या प्रवासाची दिशा शोधण्यासाठी शिबिरार्थींना मदत होते. या वर्षीच्या शिबीरात विज्ञान ही थीम होती.

पाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आयोजित युवा छावणी 2018 या 7 दिवसीय निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला. दरवर्षी छावणीतील वेगवेगळ्या थीमसह स्वभान ते समाजभान या प्रवासाची दिशा शोधण्यासाठी शिबिरार्थींना मदत होते. या वर्षीच्या शिबीरात विज्ञान ही थीम होती.

या शिबीरासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या युवक-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग होता. कॅ. अमोल यादव यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. शिबीरात विवेक सावंत, अतुल पेठे, संजीव चांदोरकर, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, डॉ.विजय नाईक, डॉ नरेश दधीच अशा मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. अत्यंत द्विधा मनस्थितीत असलेल्या सर्व शिबिरार्थींना हे शिबीर संपूच नये अस वाटत होते. शिबीरात मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन समाजाचं भान, जगण्याची दिशा सापडल्यासारखं वाटत होत. असे मत छावणीतील युवकांनी व्यक्त केले.

समाजाच्या सद्यस्थितीकडे संविधानिक मूल्यांच्या फ्रेममधून पाहायला शिकवणारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची युवा छावणी उद्याचे विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक घडवण्याचे काम करीत आहे. तरुणांना मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी देते. त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी गाणी आणि व्यक्तिमत्व विकास शिकवणारे खेळ या माध्यमातून तरुणांना त्यांच्याच भाषेत संवाद साधता येत आहे. शिबिरार्थींनी रोज २ तास श्रमदान करत स्मारक परिसरात जलसंधारणाचे मोठे काम केले. अत्यंत भारलेल्या व भरभरून मिळाल्याच्या समाधानाने या सर्व तरुणांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक सोबत जोडून राहून समाजासाठी काही करण्याचा निर्धार व्यक्त केला.

समारोपाच्या शेवटी माजी अध्यक्ष युवराज मोहिते यांनी हा समारोप नसून बीजारोपण आहे अस सांगून शिबिरार्थींची हि उर्जाच हि छावणी व हे स्मारक पुढे सुरु ठेवेल याची खात्री वाटते अस सांगितलं. समारोप प्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते, कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर, सचिव डॉ संजय मं. गो., सहसचिव दिनकर पाटील, विश्वस्थ राजन इंदुलकर, सतीश शिर्के, स्थानिक समिती सदस्य संदेश कुलकर्णी, युवा कार्यकर्ते विजय, जयश्री व चिंतामणी व शिबीरार्थी उपस्थित होते.

Web Title: youth get new direction in camp