रत्नागिरीकरांच्या आदरातिथ्याने झाकीरभाई खूष...!

zakir hussain welcome in ratnagiri
zakir hussain welcome in ratnagiri

रत्नागिरी - फक्त विमान प्रवास करून मैफलीस जाणारे तालांचे सम्राट रत्नागिरीकरांच्या प्रेमाखातर रेल्वेने आले. रत्नागिरीकरांच्या आदरातिथ्याने ते खूपच भारावले. संवादिनी साथीदार पं. अजय जोगळेकर यांच्यामुळेच झाकीरभाई येथे सादरीकरणासाठी आले. आर्ट सर्कलच्या कला, संगीत महोत्सवाच्या दशकपूर्तीनिमित्त झाकीरभाई येथे आले आणि त्यांनी सुमारे साडेतीन हजारांहून अधिक श्रोत्यांना जिंकले. थिबा राजवाडा परिसरात होणाऱ्या या महोत्सवाने शिखर गाठले.

हुसेन यांचा मुंबईतून कोकणकन्या एक्‍स्प्रेसने प्रवास सुरू झाला. त्यांच्यासमवेत न्यूयॉर्क येथील शिष्या, संवादिनीवादक पं. जोगळेकर, पत्नी, मुलगी, आर्ट सर्कलचे भालचंद्र तेंडुलकर होते. त्यांचा रेल्वेचा प्रवास सुरेख होण्याकरिता रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली. सीएसटी स्थानकावर कोकण रेल्वेचे टीसी महेश पेंडसे यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे प्रवासामध्ये उस्तादजींनी पं. जोगळेकर यांच्या कन्येसोबत भेंड्या खेळल्या, अनेक विषयांवर गप्पा मारल्या.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सकाळी साडेसहाला आल्यानंतर आर्ट सर्कलच्या सदस्यांनी झाकीरभाईंचे स्वागत केले. त्याचवेळी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेलेले नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही रत्नागिरीकरांच्या वतीने झाकीरभाईंचे हसतमुखाने स्वागत केले. आर्ट सर्कल, लेन्स आर्टच्या टीमला उस्तादजींच्या आगमनाने अत्यानंद झाला.

त्यानंतर ते नारायणमळी येथील बंगल्यावर विश्रांतीसाठी गेले. तेथे झाकीर हुसेन यांचे आदरातिथ्य करण्यात आले. सकाळच्या हवेतील गारवा व खाडी, सूर्याचे विलोभनीय दृष्य पाहून झाकीरभाई भारावले. या वेळी झाकीरभाईंनी ईशस्तवन केले आणि आर्ट सर्कलच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गायकीचे अंग अनुभवता आले. रत्नागिरीत सूर्योदय पाहिला आता पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेऊन मी रत्नागिरीकरांचा निरोप घेईन, असे उद्‌गारही त्यांनी यावेळी काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com