झाप सोसायटी आदिवासीवाडीवर नळपाणी पुरवठा सुरू

अमित गवळे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पाली - वाडवडील गेले, कित्येक जणांना निवडून दिल तरी गावात पाणी आल नाही. पण आता पाणी आल आमची पायपीट थांबली हे आश्वासक विधान आहे  झाप येथील सोसायटी आदिवासीवाडीतील बांधवांची. या वाडीवर पहिल्यांदा नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी होणारी पायपीट आणि त्रास संपला आहे.

पाली - वाडवडील गेले, कित्येक जणांना निवडून दिल तरी गावात पाणी आल नाही. पण आता पाणी आल आमची पायपीट थांबली हे आश्वासक विधान आहे  झाप येथील सोसायटी आदिवासीवाडीतील बांधवांची. या वाडीवर पहिल्यांदा नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी होणारी पायपीट आणि त्रास संपला आहे.

या आदिवासी वाडीजवळ एक विहीर आहे. जानेवारी नंतर यातील पाणी आटते. मग वाडीपासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून उन्हातान्हात, काटेरी-झाडे झुडपांच्या खडतर वाटेवर पायपीट करून आदिवासी बांधवांना पाणी आणावे लागत होते. मात्र पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके, उपसरपंच विजय मराठे, ग्रामविकास अधिकारी ए.एस. जमधाडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या वाडीची ही परवड थांबविण्याचा विडा उचलला. आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विहीर नीट दुरुस्त करण्यात आली. विहिरीवर पंप बसविला, त्याला बंदिस्त मीटर व स्विच लावला गेला. गावकऱ्यांनी श्रमदान करून विहिरी पासून गावापर्यंत खोदून पाईपलाईन आणली. आणि गावात नळपाणी पुरवठा सुरू करण्यात आला. साठवण टाकी बांधण्यात आली. आता वाडीवर लोकांना अगदी घरासमोर पाण्याचे नळ आले आहेत. त्यामुळे पाण्यासाठीची त्यांची इतक्या वर्षाची पायपीट आणि त्रास थांबले. आपल्या छोट्याशा वाडीवर कधी हे सुख पहायला व अनुभवायला मिळेल याची येथील आदिवासी बांधवांना खात्री नव्हती. मात्र ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे हे शक्य होऊ शकले. आदिवासी बांधव बाळू वालेकर याने ग्रामपंचायतीचे आभार मानले. तर बारकी या आदिवासी महिलेने सांगितले की पाणी जवळ आल्याने मोठी पायपीट व त्रास थांबला आहे. वेळ देखील वाचत आहे. या वाडीच्या बाजूला असलेल्या झाप आदिवासी वाडीवर देखील आगामी काळात अशी योजना करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी सांगितले.

Web Title: Zap Society Adivasiwadi water supply supply started