मदार महिला मतदारांवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

यादी निश्‍चिती - जिल्ह्यात १० लाख ७१ हजार मतदार

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी १० लाख ७१ हजार ८४१ मतदार मतदान करणार आहेत. अंतिम मतदार यादी निश्‍चित झाली आहे. त्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या नेहमीप्रमाणे अधिक आहे. त्यांच्यावरच उमेदवारांची मदार राहणार आहे. पुरुष मतदार ५ लाख ९ हजार ४२९, तर महिला मतदार ५ लाख ६२ हजार ४०५ आहेत. चिपळूण व रत्नागिरी तालुक्‍यात मिळून ७ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. मतदार यादी निश्‍चितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होईल. २०११ च्या जनगनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या घटली आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद गटांच्या रचनेवरही झाला. दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण रद्द झाले. ५७ गटांची जिल्हा परिषद ५५ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्वाधिक मतदार रत्नागिरी तालुक्‍यात १ लाख ८६ हजार आहेत. सर्वात कमी मतदार संख्या ४९ हजार ६७८ मंडणगड तालुक्‍याची आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात महिलांची संख्या सर्वाधिक असते. ग्रामीण भागामध्ये महिला मतदारांवरच उमेदवाराचे भवितव्य ठरविले जाते. सर्वाधिक महिला मतदार रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्‍वर या तीन तालुक्‍यात आहेत. ५२ हजार ९७६ महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक आहेत. 

कोकणातील पुरुष वर्ग नोकरीनिमित्त परजिल्ह्यात आहेत. त्यामुळे महिला वर्गाकडून मतदानाची अपेक्षा अधिक असते. त्याचा फायदा उठविण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने रणनीतीही आखली जात आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमांसह महिला बचत गटांचे एकत्रित कार्यक्रम घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे.

Web Title: zilla parishad election