राणे देतील तोच उमेदवार - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

वेंगुर्ले - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे देतील तेच उमेदवार अंतिम असणार आहेत. त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेली कटुता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर विसरून आपल्या भागात मिळालेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करतील. आपला काँग्रेसचा हक्काचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी मठ येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.

तालुक्‍यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांची बैठक मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एम. के. गावडे, पंचायत समिती उपसभापती स्वप्नील चमणकर, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, आडेलीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर, रवी खानोलकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनिष दळवी, शहर अध्यक्ष दत्तप्रसाद आजगावकर यांच्यासह इच्छुक उमेदवार, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

उभादांडा व मातोंड जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार, पदाधिकारी यांच्याशी आमदार राणे यांनी वेंगुर्लेतील हॉटेल कोकण किनारा येथे संवाद साधला. या वेळी माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, जगन्नाथ डोंगरे, सारिका काळसेकर, संतोष गावडे, कमलेश गावडे, बाबली वायंगणकर, तुषार साळगावकर, चित्रा कनयाळकर, मनवेल फर्नांडिस यांच्यासह दोन्ही भागातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार तसेच नगरसेवक प्रकाश डिचोलकर, पूनम जाधव, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, दादा सोकटे उपस्थित होते.

Web Title: zilla parishad & panchyat committe election