पुर येथील जिल्हा परिषद शाळा शनिवारी दप्तराविना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

साडवली - दप्तराचे ओझे कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र शनिवारी शाळेत दप्तरच आणायचे नाही असा नवा उपक्रम संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पुरने राबवला आहे. या नविन उपक्रमांमुळे येथील विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत.

साडवली - दप्तराचे ओझे कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र शनिवारी शाळेत दप्तरच आणायचे नाही असा नवा उपक्रम संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पुरने राबवला आहे. या नविन उपक्रमांमुळे येथील विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत.

पुर मराठी शाळेत शनिवारी दप्तरच आणायचे नाही असा ठराव ६ आॅक्टोबर पासुन सुरु झाला. दप्तर नाही म्हणजे अभ्यास नाही असा प्रकार झाला नाही उलट अभ्यासक्रमाचे चार टप्पे ठरवण्यात आले आणि तसे वेळापत्रक आखण्यात आले.

दर शनिवारी सकाळी मुले शाळेत जमली की हजेरी, प्रार्थना या गोष्टी होतात. पहिला टप्पा हा इंग्रजी परीपाठाचा होतो. दुसरा टप्पा व्यायाम, कवायती, योगासने, मनोरंजक खेळ असा असतो. तिसरा टप्पा हा इंग्रजी कविता गायन, संभाषण, सादरीकरण असा होतो. ४ था टप्पा हा ग्रंथालयातील आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे व त्यावर चर्चा करायची, नवीन पुस्तकांचा परीचय करुन द्यायचा, कथा सादर करायची तसेच संगणक शिक्षण,परीसर भेट व मैदानी खेळ असे हे वेळापत्रक ठरलेले आहे. शिक्षक महावीर कांबळे व सहकारी शिक्षक यांनी हे वेळापत्रक तयार केले असुन दर शनिवारी हा उपक्रम सुरु झाला आहे. यामुळे मुलांचे अवांतर वाचन व मैदानी खेळ,व व्यायाम यामुळे आरोग्यपुर्ण वातावरण तयार होण्यास मदत होत आहे.
दप्तराचे ओझे कमी करतानाच हाही उपक्रम सर्व शाळांनी राबवल्यास एक दिवस दप्तरावीना ही संकल्पना मुलांना,पालकांना फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: Zilla Parishad School of Pur without School bag on Saturday