जिल्हा परिषदेची शाळा झाली डिजिटल

अमित गवळे
शनिवार, 5 मे 2018

पाली- सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद वाफेघर शाळेने लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या मदतीने दोन वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत. त्याच बरोबर विदयार्थ्यांना टॅबचे वाटप देखिल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची जोड़ देऊन शिक्षणाचा प्रचार प्रसार वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून हे कार्य केल्याचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी सकाळला सांगितले.

लोकसहभाग व खवली ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त अयोगातून शाळेच्या दोन्ही वर्गखोल्या डिजिटल करुन विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले गेले. त्या बरोबरच कलर प्रिंटर, संगणक ,साउंड सिस्टिम अशा अनेक शालेपयोगी तांत्रिक वस्तुंचे वाटप देखिल करण्यात आले.

या कार्यक्रमास सुधागड-पाली पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे,  गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, खवली ग्रामपंचायत सरपंच रुचिता बेलोसे, केंद्र प्रमुख रमेश रोहेकर,सामाजिक कार्यकर्ते राजेश बेलोसे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मेने, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा सविता चव्हाण, सखाराम दिघे व खवली केंद्रातील सर्व शिक्षक तसेच वाफेघर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी मान्यवारांचे स्वागत केले व संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासात्मक बाबी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे शाळेस लाभलेले सहकार्य यामुळेच शाळेचा विकास साधता आला. डिजिटल वर्ग व टॅबच्या मदतीने ग्रामिण व वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांना देखिल आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवीन गोष्टी शिकता येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल. 
राजेश गायकवाड, मुख्याध्यापक, राजिप शाळा, वाफेघर

Web Title: Zilla Parishad's school turned digital