जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू 

प्रणय पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अलिबाग - रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका 21 फेब्रुवारीला होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 12) हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आघाड्या-युत्यांची गणिते, जागावाटपाचा ताळमेळ साधण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. 

जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेतकरी कामगार पक्ष यांची आघाडी तर शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्या युतीत जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. कॉंग्रेस कार्यकर्ते दुहेरी भूमिकेत आहेत. काही पदाधिकारी आघाडीसोबत, तर काही युतीसोबत बोलणी करीत आहेत. 

23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच इच्छुकांनी उमेदवारीसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी, तर 15 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेतकरी कामगार पक्ष आघाडीची सत्ता आहे. 15 पंचायत समित्यांपैकी सहा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या, पाच शेतकरी कामगार पक्षाच्या, तर चार शिवसेनेच्या ताब्यात आहेत. 

जिल्हा परिषदेची सत्ता आघाडीकडून खेचून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. शिवसेनेची भाजपसोबत जागा वाटपाची चर्चाही सुरू आहे. या घडामोडीत कॉंग्रेसमध्ये मात्र एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. अलिबाग व पेण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेसोबत चर्चा करत आहेत. उर्वरित ठिकाणचे पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीसोबत चर्चा करत असल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे चर्चा करत आहेत. शिवसेना-भाजप युतीसाठी शिवसेनेचे तीनही जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी चर्चा करत आहेत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी चर्चेवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: zp election Seat-sharing start