मुलांच्या जीवितास धोका होईपर्यंत थांबू नका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सावर्डे - सावर्डे, अडरे, अनारी, कोंडमळा या धनगरवाड्यांसाठी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सोयी-सुविधा कधी येणार साहेब... हा आर्त सवाल धनगरबांधवांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. चार धनगरवाड्यांसाठी असलेली सावर्डे-धनगरवाडी शाळेची दुरवस्था पाहून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शाळा सुधारण्याची ग्वाही दिली. मुलांच्या जीवितास धोका पोचेपर्यंत वाट पाहू नका, असे संतोष खरात यांनी सांगताच पदाधिकारी आणि अधिकारी निःशब्द झाले.

शाळेची मुले चुणचुणीत, हुशार आणि पटसंख्या चांगली असतानादेखील धनगरवाडीतील शाळा भौतिक सुविधांपासून वंचित आहे. येथील शिक्षक संघर्ष करीत विद्यार्थ्यांचा घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. २६ पटसंख्या असलेल्या शाळेला दोन वर्गखोल्या आहेत. सामाजिक बांधिलकीतून जिंदल कंपनीने दिलेला संगणक, सौरऊर्जेचा वापर येथे होते. सभापती सौ. निकम यांनी शाळा दत्तक घेतली आहे. मुख्याध्यापक श्री. झटाले व श्री. सुनील वरेकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कुवत व कौशल्य वाढवले. सभापती सौ. निकम, तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, 
गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांनी शाळेला भेट दिली. शाळेच्या छपराला वाळवीने पोखरले आहे. भिंतीची पडझड, संरक्षण भिंत, मुलांना खेळण्यासाठी साधनाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. ज्ञानरचनावाद, तंत्रस्नेही अध्यापन-अध्ययन, इमारत रंगरंगोटी, सुशोभीकरण, शैक्षणिक वातावरण यांसह सोयीसुविधांची आवश्‍यकता आहे.
सभापती सौ. निकम यांनी अधिकाऱ्यांना शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने करण्यास सांगितले. पोषण आहार खोलीत जाऊन अन्नधान्याची पाहणी केली. निकृष्ट डाळीचे नमुने देखील त्यांनी घेतले असून गटशिक्षणाधिकारी शिगवण यांना पोषण आहाराकडे लक्ष द्या, असे आदेश दिले आहेत.

तालुक्‍यातील धनगर समाजासारख्या वंचितांपर्यंत प्रगत शिक्षण पोचविणार असून शाळांना भेटी देऊन माहिती घेतली जात आहे. लवकरच सर्व शाळा प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करतील.
- पूजा निकम, सभापती

Web Title: zp school dangerous