विषय समिती निवडींकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापतिपदांच्या निवडीची प्रतीक्षा लागली आहे. ही निवड प्रक्रिया 7 एप्रिलला विशेष सभेत होणार आहे. सभापतिपदाची संधी कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगू लागल्या असल्यातरी प्रत्यक्षात कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापतिपदांच्या निवडीची प्रतीक्षा लागली आहे. ही निवड प्रक्रिया 7 एप्रिलला विशेष सभेत होणार आहे. सभापतिपदाची संधी कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगू लागल्या असल्यातरी प्रत्यक्षात कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड 21 मार्चला झाल्यानंतर जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदांच्या निवडीसाठी 7 एप्रिलला दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 7 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत समाजकल्याण समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती या दोन सभापतिपदाच्या निवडीसह विषय समिती सभापती दोन पदांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत सावंतवाडी व कुडाळ तालुक्‍यांना संधी मिळाली असल्याने या एकूण चार सभापतिपदाच्या निवडीसाठी अन्य सहा तालुक्‍यापैकी चार तालुक्‍यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्‍यात सभापतिपद मिळावे यासाठी प्रत्येक तालुका कॉंग्रेस पदाधिकारी आपली ताकद वापरणार आहेत, तर प्रत्येक तालुक्‍यातून सभापतिपदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या निवडीतही पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. कोणीही नाराज होऊ नये आणि कोणत्या तालुक्‍यावर अन्याय होऊ नये हे सर्व पाहतानाच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निवड होणार असे अपेक्षित आहे; परंतु कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घालायची हे कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या हाती असल्याने चर्चेत अनेकांची नावे पुढे असलेतरी सभापतिपदाच्या 4 जागा असल्याने 6 पैकी 2 तालुक्‍यांना प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्‍यांना प्रतीक्षा करावी लागणार हे 7 एप्रिलच्या सभापतिपदाच्या निवडीनंतचर स्पष्ट होणार आहे. 

Web Title: zp Sindhudurg Topic selection committee's attention