सिंधुदुर्ग : सत्तेसाठी वखवखलेले कटात सामील ; बबन साळगावकर

‘सिल्व्हर ओक’वरील हल्ला निंदनीय
 Baban Salgaonkar
Baban Salgaonkarsakal

सावंतवाडी: राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेला हल्ला हा निंदनीय असून आपण त्याचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती हीन दर्जाची होत चालली आहे, याचे उदाहरण आपल्याला या कृत्यातून पाहायला मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिली.

सत्तेसाठी वखवखलेले पुढारी या कटामध्ये सहभागी आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने करावी, अशी मागणी श्री. साळगावकर यांनी केली. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून त्यात म्हटले आहे की, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला करणारे खरे एसटी कर्मचारी होते की भाडोत्री गुंड? याची चौकशी व्हायला हवी. एसटी कर्मचाऱ्यांना आमचाही पाठिंबा होता. त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होतो; परंतु पुढे काही दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा राजकारणासाठी वापर सुरू झाला. विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाचा स्वार्थासाठी, राजकारणासाठी वापर करून घेतला.

या सहा महिन्यांमध्ये जवळ जवळ १०० पेक्षा जास्त कर्मचारी गमवावे लागले. हे विरोधी पक्षाचे पाप आहे. कर्मचाऱ्यांना भडकावून, भावनिक आव्हान करून विरोधी पक्षाकडून आशा दाखविली जात होती. तसेच कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. याचाही तीव्र निषेध करतो. चुकीच्या लोकांच्या हातामध्ये संपाचे नेतृत्व गेल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचे खापर आपल्यावरती फुटणार म्हणून काल झालेल्या सभेमध्ये सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण देऊन ही दंगल घडवून आणली. अशा वकिलावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असे मत साळगावकर यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com