भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेवरही कोरले नाव

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई - कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक, मुरली विजय, जयंत यादव यांची शतकी खेळी, रवीचंद्रन अश्‍विनने घेतलेले बारा बळी अशा बहारदार खेळाच्या प्रदर्शनामुळे भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 36 धावांनी दणदणीतपणे जिंकला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी मिळवत मालिकेवरही नाव कोरले आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने चांगला खेळ करत मोठी धावसंख्या उभारू शकेल अशी परिस्थिती निर्माण केली होती. मात्र रवीचंद्रन अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडला 400 धावांत रोखले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत 631 धावांचा डोंगर उभारून 235 धावांची आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने 340 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 235 धावा केल्या. तर मुरली विजयने 282 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या सहाय्याने 136 धावा केल्या. यासोबतच जयंत यादवनेही 204 चेंडूत 15 चौकारांसह कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक केले. त्यानंतर 235 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला फारसा सूर गवसला नाही. दुसऱ्या डावातही रवीचंद्रन अश्‍विनने 6 बळी मिळवत भारताला विजय प्राप्त करून दिला.

अंतिम धावफलक
पहिला डाव
इंग्लंड : सर्वबाद 400 धावा
भारत : सर्वबाद 631 धावा

दुसरा डाव
इंग्लंड : सर्वबाद 195 धावा

Web Title: India vs England; India won by 36 runs and one innings