सचिन-फेडररमध्ये खेळातील ज्ञान देवाण-घेवाण "स्पर्धा'

वृत्तसंस्था
Wednesday, 11 July 2018

लंडन : भारतात एकमेकांना फिटनेस चॅलेंज दिले जाण्याचे लोण पसरले जात असताना विंबल्डनमध्ये चॅंपियन्स सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये आपापल्या खेळातील ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे "चॅलेंज' लागले. सचिनने ट्विटरवरून केलेली मागणी पूर्ण करण्याची तत्परता फेडररनेही दाखवली. 

फेडररचा सामना पाहण्यासाठी सचिन सेंटर कोर्टवर उपस्थित होता. नेहमीप्रमाणेच नजर आणि हातातील जादू याचा सुरेख संगम असे फेडररचे कौतुक करताना सचिनने, "तू नववे विंबल्डन विजेतेपद मिळवलेस तर आपण क्रिकेट आणि टेनिसमधील एकमेकांचे ज्ञान परस्परांना देऊ,' असे ट्विट केले. याला तत्काळ प्रतिसाद देताना फेडररने, "थांबायचे कशाला आत्ताच या ज्ञानाची देवाण-घेवाण करू' असे ट्विट करून सचिनबरोबरच्या मैत्रीचा सन्मान ठेवला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar And Roger Federer talks about Cricket and Tennis