क्रिकेटमध्ये वादळ; चेंडू कुरतडल्याची कांगारूंची कबुली

वृत्तसंस्था
Saturday, 24 March 2018

केपटाऊन : स्लेजींगमध्ये तरबेज असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी अखिलाडुवृत्तीचा कडेलोट करीत चेंडू कुरतडण्यापर्यंत कहर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा नियमाबह्य कॅमेरॉन बँक्रॉफ्ट केल्याची कबुली कर्णधार स्टीव स्मिथ याने दिली. यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून कारकिर्दीत अनेक वेळा शिस्तभंग केलेल्या शेन वॉर्न यानेच पहिली प्रतिक्रिया व्यक्त करीत कांगारूंना घरचा आहेर दिला.

बँक्रॉफ्टने खिशातून एक पिवळी वस्तू काढून ती चेंडूवर घासल्याचे टीव्ही कॅमेऱ्याने टिपले. हे लाईव्ह दिसत असल्याचे लक्षात येताच बँक्रॉफ्ट चपापला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप ठेवला आहे.

स्मिथने सांगितले की, आमच्या संघाने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला. कसोटीवर वर्चस्व मिळविण्याचा आमचा हेतू होता. संघाच्या नेतृत्वाची सुत्रे असलेल्या गटाने (लिडरशीप ग्रुप) मुद्दाम हा डाव रचला. उपाहाराच्यावेळी तशी चर्चा झाली. जे काही घडले त्याविषयी मला अभिमान वाटत नाही. हे खेळाचे तत्त्व नाही. माझी निष्ठा आणि संघाच्या एकात्मतेला तडा गेला आहे. ते अटळच आहे. हे योग्य नाही आणि यापुढे असे घडणार नाही असे वचन मी तुम्हाला देतो.

इतक्या स्पष्ट शब्दांत कबुली देतानाच स्मिथने कर्णधारपद सोडणार नसल्याचाही पवित्रा घेतला. 

त्यानंतर मैदानावरील पंच नायजेल लाँग आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी बँक्रॉफ्टशी चर्चा केली. त्यावेळी तो संबंधित वस्तू पँटच्या समोरच्या खिशात ठेवत होता. त्याने नंतर खिशातून काळे कापड काढून पंचांना दाखविले. मग खेळ पुढे सुरु झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा