World Cup 2019 : 'विराट'चा विक्रम; सचिन, पाँटिंगला टाकले मागे

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

विराट कोहलीने 51वे अर्धशतक झळकावताना 11000 धावांचा टप्पा पार केला. विराट कोहलीने हा टप्पा 222 डावांत पार केला आहे. हा टप्पा पार करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाठीमागे टाकले.

वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर:
आजच्या भारत-पाक सामन्यात भारताने चांगली फलंदाजी केली रोहित सलामीवीर रोहित शर्माने शतक केल्यावर कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली. विराट कोहलीने 51वे अर्धशतक झळकावताना 11000 धावांचा टप्पा पार केला. विराट कोहलीने हा टप्पा 222 डावांत पार केला आहे. हा टप्पा पार करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाठीमागे टाकले.

11000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी रिकी पाँटिंगला 276 डावांची गरज पडली होती. तर, याच 11000 धावा करण्यासाठी सचिन तेंडुलकरने 286 डावांची मदत घेतली होती. त्यानंतर सौरभ गांगुलीने हा टप्पा 288 डावांमध्ये पूर्ण केला होता. या सर्वांना मागे सोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीने हा टप्पा केवळ 222 डावांमध्ये पूर्ण केला आहे.

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11000 धावांचा टप्पा केवळ 222 डावांमध्ये पार करून मोठा विराट विक्रम केला आहे. दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता लागली होती. मध्येच, पावसामुळे सामना होणार की नाही हा एकच प्रश्न असताना पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याला सुरवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना धिम्या गतीने सुरवात केली होती. पण नंतर भारत चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा