ट्‌वेंटी-20 मध्ये गोलंदाज धोका पत्करत नाहीत - ब्रेट ली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - ट्‌वेंटी-20 प्रकारात गोलंदाज धोका पत्करत नाहीत. त्यामुळे त्यांना अखेरच्या षटकात जास्त धावा देणे भाग पडते, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले.

मुंबई - ट्‌वेंटी-20 प्रकारात गोलंदाज धोका पत्करत नाहीत. त्यामुळे त्यांना अखेरच्या षटकात जास्त धावा देणे भाग पडते, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले.

बोलिंग मास्टरद्वारे स्टार्ट अप जगतात प्रवेश करण्याचा ब्रेट ली याचा विचार आहे. त्यासाठीच तो मुंबईत आला होता. तो एका खास उपकरणाद्वारे गोलंदाजांना मार्गदर्शन करत आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ""यॉर्कर हा खेळातील महत्त्वाचा भाग आहे; पण गोलंदाज याचा जास्त वापरच करत नाहीत. आयपीएलमध्ये मी अजून हळुवार चेंडूचा बाऊन्सर बघितलेला नाही किंवा यष्टींच्या बाहेर टाकला जाणारा यॉर्करही दिसत नाही. अर्थात हा टप्पा अर्धा मीटरने चुकला तरी षटकारास सामोरे जावे लागते. जसप्रीत बुमराने यॉर्कर टाकण्याचे कौशल्य चांगले हस्तगत केले आहे. हे साध्य न केल्यामुळे अनेकांना षटकार स्वीकारावा लागला आहे. सर्वोत्तम यॉर्कर हा कसोटी, एकदिवसीय लढत; तसेच ट्‌वेंटी-20 मध्येही सर्वोत्तम असतो. सरावानेच हे साध्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजाने इगो घरातील लॉकरमध्ये ठेवूनच मैदानात येणे योग्य असते.''

गुड लेंथ टप्प्यावर चेंडू कधी टाकावा, हेही महत्त्वाचे असते. नवा कोरा चेंडू असताना या टप्प्यावर टाकलेला चेंडू प्रभावी ठरतो; पण चेंडू जुना झाल्यावर त्या टप्प्यावर पडलेला फटकारला जातो, असेही तो म्हणाला.

Web Title: 20-20 match bowlers are not on risk