महिला ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप भारत-पाकिस्तान एकाच गटात

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

- महिलांची सहावी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा 
- दुसऱ्यांदा वेस्ट इंडीज यजमान 
- महिलांची ही ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा प्रथमच स्वतंत्र होणार. 
- विंडीजमधील तीन विविध मैदानांवर एकूण 23 सामने. 
- ऑस्ट्रेलिया सर्वाधित तीन वेळा विजेते, इंग्लंड, विंडीज प्रत्येकी दोनदा. 

मुंबई - या वर्षात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या महिलांच्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून भारताची सलामी न्यूझीलंडविरुद्ध होत असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. ही स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान विंडीजमध्ये होणार आहे. 

दहा संघांचा समावेश असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एक संघ पात्रता स्पर्धेतून पात्र ठरणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यानंतर भारताचा पाकिस्तानविरुद्ध 11 नोव्हेंबरला होणार आहे. 

दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरतील. या लढती 22 नोव्हेंबरला होत असून अंतिम सामना 24 तारखेला होईल. 

अशी होईल स्पर्धा 
गटवारी ः अ गट ः वेस्ट इंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, आणि पात्रता फेरीतील संघ 
ब गट ः ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि पात्रता फेरीत संघ. 

- महिलांची सहावी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा 
- दुसऱ्यांदा वेस्ट इंडीज यजमान 
- महिलांची ही ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा प्रथमच स्वतंत्र होणार. 
- विंडीजमधील तीन विविध मैदानांवर एकूण 23 सामने. 
- ऑस्ट्रेलिया सर्वाधित तीन वेळा विजेते, इंग्लंड, विंडीज प्रत्येकी दोनदा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2018 Women’s World T20