पाकिस्तान, विंडीजला विश्वकरंडकात थेट प्रवेश नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

एकदिवसीय क्रमवारी -

 • 1) दक्षिण आफ्रिका - 119 गुण
 • 2) ऑस्ट्रेलिया - 118 गुण
 • 3) न्यूझीलंड - 113 गुण
 • 4) भारत - 112 गुण
 • 5) इंग्लंड - 108 गुण
 • 6) श्रीलंका - 98 गुण
 • 7) बांगलादेश - 92 गुण
 • 8) पाकिस्तान - 89 गुण
 • 9) वेस्ट इंडीज - 84 गुण
 • 10) अफगाणिस्तान - 52 गुण

दुबई - वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 जिंकूनही पाकिस्तानला 2019 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश मिळविता येणार नाही. वेस्ट इंडीजच्या संघालाही पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (बुधवार) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर आहे. तर, वेस्ट इंडीजचा संघ नवव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांच्या तुलनेने दुबळा असलेला बांगलादेशचा संघ क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे बांगलादेशला विश्वकरंडकासाठी थेट स्थान मिळाले आहे. त्यांना पात्रता सामने खेळावे लागणार आहे. पाकिस्तानला विश्वकरंडकात पात्र होण्यासाठी विंडीजविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकणे गरजेचे होते. पण, पहिल्याच सामन्यात विंडीजच्या संघाने 309 धावांचे आव्हान पार करत विजय मिळविला होता. विंडीजने त्यांच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच 300 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले होते.

आता पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजला पुढील वर्षी होणाऱ्या पात्रता फेरीत आपले स्थान पक्के करावे लागणार आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत दहाच संघ सहभागी होणार आहेत. 1 मे 2017 रोजी आयसीसीच्या क्रमवारीनुसार संघांची पात्रता ठरणार होती. सध्या कोणताही संघ एकदिवसीय मालिका खेळत नसल्याने हीच क्रमवारी अंतिम आहे.

एकदिवसीय क्रमवारी -

 • 1) दक्षिण आफ्रिका - 119 गुण
 • 2) ऑस्ट्रेलिया - 118 गुण
 • 3) न्यूझीलंड - 113 गुण
 • 4) भारत - 112 गुण
 • 5) इंग्लंड - 108 गुण
 • 6) श्रीलंका - 98 गुण
 • 7) बांगलादेश - 92 गुण
 • 8) पाकिस्तान - 89 गुण
 • 9) वेस्ट इंडीज - 84 गुण
 • 10) अफगाणिस्तान - 52 गुण
Web Title: 2019 ICC World Cup: Pakistan, West Indies fail to get direct qualification