34 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदा उंचावला होता विश्वकरंडक

वृत्तसंस्था
Monday, 25 June 2018

25 जून, 1983 रोजी कपिल देवने विश्वकरंडक उंचावला आणि हा दिवस भारतीय क्रीडा विश्वात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात त्यावेळी सर्वांत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. वेस्ट इंडिजशिवाय विश्वकरंडक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला

भारताला पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकून आज 34 वर्षे पूर्ण झाली. जाणून घ्या 1983च्या विश्वकरंडकातील काही मनोरंजक गोष्टी.
25 जून, 1983 रोजी कपिल देवने विश्वकरंडक उंचावला आणि हा दिवस भारतीय क्रीडा विश्वात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात त्यावेळी सर्वांत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. वेस्ट इंडिजशिवाय विश्वकरंडक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला. त्यापूर्वीचे दोन्ही विश्वकरंडक हे वेस्ट इंडिजनेच जिंकले होते. 
 
1983 च्या विश्वकरंडकातील काही मनोरंजक गोष्टी-
1. 1983 चा विश्वकरंडक हा तिसरा क्रिकेट विश्वकरंडक होता. सर्व सामने इंग्लंड आणि वेल्स येथे जून 9 ते जून 25 दरम्यान खेळले गेले.
2. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी भाग घेतला होता.

  • भारत
  • इंग्लंड
  • ऑस्ट्रेलिया
  • न्यूझीलंड
  • वेस्ट इंडिज
  • झिंबाब्वे
  • श्रीलंका
  • पाकिस्तान

3. सर्व संघ पांढऱ्या पोशाखात खेळले तर प्रत्येक सामना 60 षटकांचा होता. 
4. सर्व सामन्यांत लाल चेंडूचा वापर करण्यात आला, तर सर्व सामने दिवसा खेळले गेले. 
5. भारत, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरी गाठली.
6. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. यात कपिल देवने तीन बळी घेतले तर यशपाल शर्माने 61 धावा केल्या. 
7. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा आठ विकेट राखून सहज पराभव केला.
8. भारत आणि वेस्ट इंडिजमधील अंतिम सामना लॉर्डसच्या क्रिकेट मैदानावर खेळला गेला. त्यात भारताने वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला. 

विश्वकरंडकातील आकडेवारी
1. सर्वाधिक धावा करणारा संघ: पाकिस्तान- 338/5 विरुद्ध श्रीलंका
2. सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज: कपिल देव, नाबाद 175 विरुद्ध झिंबाब्वे
3. सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज: रॉजर बिन्नी (भारत)- 18
4. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: विन्स्टन डेव्हिस (वेस्ट इंडिज)- 7/51 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
5. सर्वोत्कृष्ट भागीदारी: डेसमंड हेन्स आणि फौद बचुस (वेस्ट इंडिज)- 172 
6. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज: डेव्हिड गोव्हर (इंग्लंड)- 384 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 34 years of India's first Cricket World Cup win